विप्र समाजाने रोटी-बेटी व्यवहार
सुरू करावेत-रामनिवास गौड
जालन्यात विप्र फाउंडेशनचे दीपावली स्नेहमिलन उत्साहात
जालना/प्रतिनिधी/ विप्र समाजाने पुन्हा रोटी-बेटी व्यवहार सुरू करून सामाजिक संबंध दृढ करावेत. त्याचबरोबर समाजातील शिक्षण, उद्योग आणि संस्कृती यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विप्र फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामनिवास गौड यांनी येथे बोलताना व्यक्त करून समाजातील ऐक्याचे आणि आत्मीयतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
विप्र फाउंडेशन शाखा, जालनाच्यावतीने रविवार दि. 26 ऑक्टोबर रोजी गायत्री मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या दीपावली स्नेह मिलन व अन्नकुट उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून रामनिवास गौड बोलत होते. यावेळी आशीर्वचन देण्यासाठी उपस्थित असलेले भक्तमाल कथा प्रवक्ता किशोर तिवारी यांनी आपल्या भाषणातून विप्र फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली. विप्र फाउंडेशन समाजातील तरुणांना योग्य दिशा देत अडून, त्यांच्या उपक्रमांमुळे समाजात नवचैतन्य निर्माण होत आहे. हे कार्य प्रेरणादायी असून सर्वांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. विप्र फाऊंडेशनचे अध्यक्ष जयप्रकाश श्रीमाली यांनी प्रत्येक सदस्याने समाजाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. एकत्र येणे, चर्चा करणे आणि समाजहितासाठी कार्य करणे हेच आपल्या प्रगतीचे गमक असल्याचे सांगून या वर्षीच्या अन्नकुट महोत्सवाचे यजमानपद स्वीकारणाऱ्या खंडेलवाल समाजाचे त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन जोशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विप्रो फाउंडेशनचे सचिव पं. विजयकुमार व्यास यांनी मानले.
कार्यक्रमाला कैलास खंडेलवाल, किशोर मिश्रा, उमेश पंचारिया, बंकटलाल खंडेलवाल, डुंगरसिंह राजपुरोहित, युवा अध्यक्ष परीक्षित शर्मा, युवा सचिव संतोष खंडेलवाल, गौरीशंकर खंडेलवाल, दिलीप गौड, लक्ष्मीनारायण खंडेलवाल, महेश खंडेलवाल, उमेश खंडेलवाल, दिलीप व्यास, चंद्रप्रकाश श्रीमाळी, दीपेश व्यास, संजय सारस्वत, प्रवीण शर्मा, सतिष शर्मा, राजेश गौड, दुर्गेश दायमा,ओमप्रकाश दायमा, अशोक शर्मा, अशोक मिश्रा, गजानन सारस्वत, हितेश जोशी, शैलेश व्यास, मनोज दायमा, नारायण दायमा, सुरेश शर्मा, किशोर शर्मा, वरुण शर्मा, नंदकिशोर गौड, महिला अध्यक्ष सौ. जया शर्मा, सचिव सौ. मंजू श्रीमाळी, कोषाध्यक्ष सौ. अरुणा पारिक, सौ. कल्पना गौड, सौ. ममता शर्मा यांच्यासह जालना शहर व परिसरातील विप्र बांधव, भगिनी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.