देवस्थानाचा मान वाढवू सिल्लोड सोयगावला नवी दिशा असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कन्नड/प्रतिनिधी/ सिल्लोड तालुक्यातील देवस्थानांचा मान वाढवू… सिल्लोड-सोयगावला नवी प्रगतीची दिशा दाखवू. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथे सांगीतल यांनी
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळे व देवस्थानांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून भक्तांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतील तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून विकासाला नवी दिशा मिळेल  अशी मागणी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनातून मतदारसंघातील अन्य महत्त्वाच्या मागण्यांचाही पाठपुरावा करण्यात आला.
यावेळी धानोरा येथील स्वामी सर्वानंद सरस्वती महाराज, जगन्नाथ गिरी महाराज, भाजपा प्रदेश चिटणीस तथा सिल्लोड सोयगाव विधानसभा नेते मा. सुरेश भाऊ बनकर माजी आमदार मा. सांडू पाटील लोखंडे, जिल्हा सरचिटणीस मा.ज्ञानेश्वर पाटील मोठे
आदी मान्यवर उपस्थित होते.