जालना येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
भास्कर आबा दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली निधीची मागणी
जालना/प्रतिनिधी/ जालना शहरातील अंबड चौफुली येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य स्मारक उभारण्यासाठी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी एका निवेदनाद्वारे केली.
भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी (दि.२६) रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिले, या निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरातील अंबड चौफुली मुख्य चौक येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वर्ष जयंतीदर्शन साजरे करण्यासाठी भव्य शिल्प स्मारक व मराठवाड्यातील सर्वात उच्च पुतळा उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सार्वजनिक जीवन, प्रशासनिक कौशल्य, सामाजिक कार्याचे मूल्य व महिला सक्षमीकरणातील योगदान हे प्रेरणादायी असून, त्यांच्या स्मृतीस स्थानिक पातळीवर सन्मानित करण्यासाठी हा भव्य शिल्प स्मारक व पुतळा उभारण्यात येत आहे. प्रस्तावित भव्य शिल्प स्मारक, पुतळा व परिसरातील सुशोभिकरणासाठी पायाभूत सुविधा, प्रकाश योजना, बेंचेस व सौंदर्यशास्त्रानुसार सुशोभित उभारणी यासाठी अंदाजे खर्च अंदाजित ३.०० कोटी रुपये (तीनकोटी) इतके आहे. या भव्य शिल्प स्मारक उभारणे व परिसराचे सुशोभिकरण करण्यास विशेष बाब म्हणून ३.०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे, सदर निवेदनाची मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेऊन जालना शहरातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य शिल्प स्मारकास निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांना दिले.
