Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादएकमेकांचे भ्रष्टाचार लपवणे हा महायुतीधर्म आहे का

एकमेकांचे भ्रष्टाचार लपवणे हा महायुतीधर्म आहे का

एकमेकांचे भ्रष्टाचार लपवणे हा महायुतीधर्म आहे का
जैन बोर्डिंग वस्तीगृहाच्या जागेवरून युतीतील शिंदे गटाचे धंगेकर यांच्या विरोधात काल भाजपचे धीरज घाटे, गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचा धर्म म्हणून भाजप आरोप करीत नव्हती परंतु आता त्यांची पण उणीधदुणी काढली जातील असा इशारा दिला आहे. त्याच वेळेस धंगेकर हे अनेक बेकायदा कामे करीत असल्याचा आरोप बिडकर यांनी केला आहे.
 भाजप ही वॉशिंग मशीन असून भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेऊन पवित्र केले जाते असे दिसून आलेले आहे तर अनेकदा यांच्या नेत्याकडून तुमची सीडी आमच्याकडे आहे अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जातात. आता एकमेकांचे भ्रष्टाचार लपवणे हा युतीचा धर्म झाला आहे का?
जैन हॉस्टेल प्रकरणांमध्ये इतके दिवस भाजप का गप्प होती. आता परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असे दिसून आल्यावर आणि या विक्री करारात अनेक चुकीच्या गोष्टी केल्या दिल्या असल्याचे समोर आल्यावर, त्यातून विक्री करार रद्द होण्याची खात्री झाल्यावरच आता ‘ माझा या व्यवहाराशी काही संबंध नाही’ अशी स्वतःलाच क्लीन चिट देणारे मुरलीधर मोहोळ  ‘मी एक तारखेपूर्वी तोडगा काढून देतो ‘ असे आश्वासन देत आहेत. हा तद्दन ढोंगीपणा असून करार करण्यात त्यांचाच हात असल्याने रद्द करणे त्यांनाच सहज शक्य आहे. आता धर्मादाय आयुक्तांना वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर होणार असून त्यामुळे हा बेकायदेशीर जैन बोर्डिंग विक्री करार रद्द होईल अशी आम आदमी पार्टी ला आशा आहे.
याच पद्धतीने अनेक धर्मादाय संस्थांच्या जमिनीवर कब्जा मिळवल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. राजकीय आशीर्वादाच्या सहाय्याने बिल्डर लॉबी हे घोटाळे करते. त्या भ्रष्टाचाराला मुळातूनच रोखण्यासाठी धर्मादाय कायद्यांची कडक अंमलबजावणी गरजेचे आहे.
मुकुंद किर्दत
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments