Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबाद१६ आक्टोंबर विश्व खाद्य दिवस 

१६ आक्टोंबर विश्व खाद्य दिवस 

१६ आक्टोंबर विश्व खाद्य दिवस

प्रति, माननीय संपादकजी.

विषय:-खाद्यपुर्तीसाठी अन्नाचा एक-एक-कण वाचविण्याची गरज.
  विश्व खाद्य दिवस कृतीत बदलायला पाहिजे तेव्हाच  जगातील “उपासमारी” संपुष्टात येईल.खाद्यांन्नाची समस्या पहाता संयुक्त राष्ट्रसंघाने १६ आक्टोंबर १९४५ ला “खाद्य व कृषि संघटन” ( एफएओ ) ची स्थापणा केली.”कॉफ्रेस ऑफ द फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गनाइजेश”(एफएओ) ने १६ आक्टोंबर १९७९ पासून “विश्व खाद्य दिवस”साजरा करण्याची घोषणा केली.तेव्हापासुन जगात “आंतरराष्ट्रीय विश्व खाद्य दिवस” साजरा केल्या जातो.या दिवसांचा उद्देश म्हणजे जगातील वाढती भुकमरीची(उपासमारी) समस्यांच्या प्रती लोकांना जागरूक करने.उपासमारी, कुपोषण व गरीबीच्या विरूद्ध संघर्षाला मजबुती प्रदान करने.उपासमारीच्या समस्येकरीता संपूर्ण जग संघर्ष करीत आहे व उपासमारी, कुपोषण यातुन बाहेर निघण्यासाठी सर्वांचा संघर्ष सुरू आहे. भारताची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करीत आहे. परंतु आजही कोट्यवधी भारतीयांची भूक भागत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.तर भारताचे एक चीत्र असेही आहे की गोडाऊनमध्ये करोडोंटन अन्न-धान्य  सडत आहे.विश्व खाद्य दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे जगातील उपासमारी (भुकमरी) संपुष्टात आनणे.परंतु जगाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की,या कार्यक्रमाच्या इतके वर्षांनंतरही सुध्दा आजही जगातील करोडो लोकांना आम्ही दोन वेळचे जेवण सुध्दा देवु शकत नाही हे जगाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.”अन्न हे पुर्ण ब्रम्ह” म्हटल्या जाते.कारण अन्नाशिवाय कोणीही जगु शकत नाही. मानव,जीवजंतू,वन्यप्राणी,जंगल संपदा यांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच. त्यामुळे अन्नाच्या नासाडीबाबत जागरूकता आवश्यक आहे. अन्न-धान्य पिकवीण्याकरीता पाण्याची आवश्यकता असते. त्याचबरोर सजीव व निर्जीव या दोन्ही घटकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.त्यामुळे अन्नाची संपूर्ण प्रक्रिया पाण्यावर अवलंबून असते. अन्न-धान्याला जेवढे महत्त्व आहे त्यापेक्षा जास्त महत्व पाण्यालासुध्दा आहे.कारण पाणी रहाले तरच अन्नाचे उत्पादन होवु शकते.१६ आक्टोंबर संपूर्ण जग “विश्र्व खाद्य दिवस”म्हणुन साजरा करतात.कारण खाद्दांनाची जोपासना करणे अत्यंत गरजेचे आहे. आज जगातील प्रत्येक व्यक्ती रोजगार मीळवीण्यासाठी का धावपळ करतो?, मोल-मजुर, कामगारांना काम मिळावे म्हणून का धावपळ करतो? यामागे एकच उद्देश असतो “वितभर पोटाची खळगी भरणे” कारण काहीना काम मिळाले नाही तर उपाशीपोटी राहावे लागते हे सुद्धा अर्धसत्य आहे यालाही नाकारता येत नाही. करोणा काळात जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उपासमारीची समस्या ओढावली होती.कारण या काळात करोडो लोकांचा रोजगार हिरावल्या गेला होता.त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये उपासमारीची समस्या दिसून आली होती.या उपासमारीच्या संकटात अनेकांना आपले प्राणसुध्दा गमवावे लागले.अशाप्रकारचे उग्ररूप करोणा काळात दीसुन आले.जगात खाद्यांन्नाला कुठेही तडा जाऊ नये याकरिता शेतकरी वर्ग आपल्या अंगातुन घाम गाळतो व शेती पिकवितो. तेव्हाच देशासह जगातील लोकांच्या “पोटाची खळगी” भरते. म्हणुनच शेतकऱ्यांना “अन्नदाता” म्हणुन संबोधल्या जाते. शेतकऱ्यांनी जर अन्न पिकवीले नाही तर संपूर्ण जनतेवर उपाशी मरण्याची पाळी येवु शकते.परंतु मानवजातीला जिवीत ठेवण्याचे दायीत्व व जबाबदारी शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे सर्वप्रथम १६ आक्टोंबर विश्व खाद्य दिवसांच्या निमित्ताने संपूर्ण शेतकरी बांधवांना मी “शतशत प्रणाम” करतो. कारण उन,पाऊस,थंडी,ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ, सुनामी आणि अकाल यांच्याशी संघर्ष करून शेतकरी शेतीतुन उत्पन्न काढत असतो.भारताला शेतकऱ्यांचा राजा संबोधल्या जाते म्हणजेच “कृषिप्रधान देश”परंतु गेल्या ७८ वर्षांपासून आजही भारतीय शेतकरी अत्यंत दु:खी असल्याचे दिसून येते. कारण आजही शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला सरकार कडून योग्य भाव मिळत नाही.सरकारकडुन बाजार समिती किंवा मंडीमध्ये योग्य भावाची घोषणा केली जात नाही.त्यामुळे भारतीय शेतकरी नाराज असल्याचे दिसून येते.आज शेतकऱ्यांचा विचार केला तर मनाने व स्थावर  मालमत्तेच्या दृष्टीकोनातून करोडपती आहे. परंतु “आर्थिकदृष्ट्या कंगाल” व शुन्य आहे.कारण भारतात शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम दलाल,व्यापारी व राजकीय पुढारी वर्ग नेहमीच करतांना दिसतात.आज व्यापाऱ्याजवळ, राजकीय पुढाऱ्यांजवळ चारचाकी गाडी, बंगला,सोने-नाने,चल-अचल संपत्ती व अवैध संपत्ती दिसून येते हे आले कोठून? भारतातील शेतकरी राबराब राबतो परंतु आताही त्यांच्या नशिबी “भोपळा” आल्याचे दिसून येते.कारण कोणतीही सरकार असो ती पुर्णपणे व्यापाऱ्यांच्या व पुंजीपती यांच्या पाठीशी असल्याचे गेल्या ७८ वर्षांपासून आपण पहात आहोत.त्यामुळे आज शेतकरी वर्ग मागासलेला आहे.भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारतीय शेतकऱ्यांनी जनतेला अन्न-धान्याची कमतरता पडू दिली नाही.परंतु चीनमध्ये १९७० मध्ये भुकमरीची महाभयानक लाट आली अशा परीस्थितीत चीनजवळ खायला अन्न-धान्य नव्हते.म्हणुन त्यांनी अन्न-धान्याऐवजी कुत्रे, मांजर, पाल, साप,कीडे-माकोडे व अन्य प्राणी खायला सुरुवात केली. चीनची ही भयावह स्थिती पहाता चीन सरकारने प्रतीबंधीत प्रांण्यांना जनतेला नेहमी करीता खाण्याची परवानगी दिली. अशा कठीण परिस्थितीतुन जावुनसुध्दा आज चीन बलाढ्य देश बनला आहे.याचे संपूर्ण चीत्र आपल्याला वुहान प्रांतातुन दीसुन आले. परंतु भारतीय शेतकऱ्यांनी स्वतंत्र पुर्वकाळात व स्वतंत्र्यानंतरसुध्दा भारत वासीयांना अन्नची कमी पडु दीली नाही ही भारतीय शेतकऱ्यांची महानता व एकनिष्ठता आहे. परंतु सरकारच्या अन्न-धान्य साठ्याचे नियोजन गोडाऊनच्या कमतरतेमुळे दरवर्षी करोडो टन अन्नधान्य सडत असते आणि यातुनच उत्पन्न होते भुकमरी (उपासमारी)ची सुरुवात.आजही भारतात मेळघाट सारख्या व अतिदुर्गम भागात भुकमरी व कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते असे का?याचा अभ्यास राजकीय पुढाऱ्यांनी करण्याची गरज आहे. आज भारतात उलटी गंगा वाहतांना दीसते देशातील ६० टक्के शेतकऱ्यांकडे करोडो रुपयांची शेती आहे.परंतु आजही भारतीय शेतकरी गरीब आहे.याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे फक्त रक्त पिण्याचे काम केल्याचे दिसून येते.त्यामुळेच आज भारतात अनेक भागातील अन्नदाता शेतकरी आत्महत्यां करतांना दिसतो.कारण त्यांची संपूर्ण शेती निसर्गावर अवलंबून असते.आतातर वाढते प्रदुषण व ग्लोबल वॉर्मिगमुळे मोठ्या प्रमाणात हवामानात बदल झाल्याने शेतकऱ्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत आनुण ठेवले आहे.विश्न खाद्य दिवसांच्या निमित्ताने शेतकरी सरकारला विचारते की मुठभर नगरसेवक, आजी-माजी आमदार-खासदार व मंत्री मेहनत न करता पाच वर्षांत करोडपती व अरबोपती कसेकाय होतात? राजकीय पुढारी शेतकऱ्यांपेक्षा एवढा मोठा आहे का?की त्याला गलेलठ्ठ पगार, पेन्शन,इतर भत्ते सरकार देते व शेतकऱ्यांना भोपळा देते.हे लोकशाहीच्या देशात चालय्य तरी काय?सर्व राजकीय पुढारी सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. समान अधिकार,समान न्याय असे खोकले आश्वासन देतात. परंतु आजच्या परिस्थितीत राजकीय पुढारीच शेतकऱ्यांचा घात करतांना दिसत आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या प्रती जागरूकता दाखवुन विश्र्व खाद्य दिवसांच्या निमित्ताने शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली पाहिजे.आंतरराष्ट्री माहिती नुसार जगात “उपाश्यापोटी” झोपणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.संयुक्तराष्ट्र खाद्य आणि कृषिसंघटना नुसार २००२ च्या तुलनेत खाद्यान्नवस्तुच्या किंमतीत १४० टक्याने भारीभरकम वाढ झाली आहे.यामुळे डिसेंबर २००७ पासुन ४० देशांना खाद्यांन्न संकटाचा सामना करावा लागत होता.सध्या गेल्या अडीच वर्षांपासून  सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध भयावह स्थितीमध्ये आहे आणि आणि आता अचानक इजरायल- हमास-हिज्बुल्ला-इराण यांचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे.यामुळे युध्दाचा भडका महाभयानक स्थितीत आहे.याचा परिणाम अन्नसाठ्यावर होवून अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे व पुढे आणखी भयावह परिस्थिती होऊ  शकते. “भारतीय खाद्य निगमने” स्वत: कबुल केले आहे की दरवर्षी गोदामातील ५० करोड रुपयांचा अनाज म्हणजे १०.४० लाख मीट्रिक टन पर्यंत अनाज सडतो किंवा खराब होतो.हीबाब कृषी प्रधान देशाच्या दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर, दु:खद व चिंताजनक बाब आहे.कारण खराब होणारे अन्न-धान्य प्रत्येकवर्षी सव्वा करोड लोकांची भुक मीटवु शकते.परंतु भारताचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की शेतकऱ्यांनी मेहनतीने तयार केलेला लाखो टन अनाज सडतो आणि यामुळेच भुकमरीची समस्या उद्भवत आहे याला नाकारता येत नाही. यामुळेच भारतात करोडो लोक उपाश्यापोटी झोपतांना दीसतात.भारताची हेही समस्या आहे की सहा वर्षांखालील ४७ टक्के मुले कुपोषणाची शीकार होत आहे.एफएओच्या माहिती नुसार भारतात २००८ मध्ये २० करोड १० लाख लोक भुकमरीचा सामना करीत होते.ग्लोबल हंगरच्या इंडेक्सने जारी केलेल्या २०२३ च्या आकडेवारीनुसार भारताचा विश्र्व भुकमरी सुचकांकमध्ये १२५ देशांच्या तुलनेत १११ वा नंबर लागतो ही बाब भारताच्या दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे.या उलट भारताच्या शेजारील देशांचा विचार केला तर त्यांची परिस्थिती भारतापेक्षा चांगली आहे यात पाकिस्तान- १०२, बांगलादेश-८१, नेपाळ-६९, श्रीलंका -६० व्या स्थानावर आहे.गेल्या काही महिन्यांपासून देशातील २० कोटी लोकांना मोफत अन्न-धान्याची “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” असतांना सुध्दा भुकबळीची संख्या वाढत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.भारतात सर्वेमध्ये हेही लक्षात आले की लग्नसमारंभ, महाप्रसाद व अन्य जेवणाच्या कार्यक्रमात हजारो टन खाद्यान्न वाया जाते.याला कोठेतरी रोखलेच पाहिजे. आजच्या परीस्थितीत अन्नाचा प्रत्येक कण वाचवीण्याची गरज आहे.आज अन्नाचा प्रत्येक दाना महत्वाचा आहे. तेव्हाच म्हणतात “दाने दाने पे लिखा है, खाने वाले का नाम” या म्हणीची पुर्तत: होवु शकते.आज १४० कोटी जनतेचे दायीत्व बनते की अन्नाचा प्रत्येक कण वाचवुन देशातील उपासमारी व कुपोषण यावर अंकुश लावला पाहिजे.विश्व खाद्य दिवसांच्या निमित्ताने मी १४० कोटी जनतेला विनंती करतो की “अन्नाचा एक-एक कण वाचवीण्याची नीतांत गरज आहे.कारण देशातील वाढती लोकसंख्या,जगातील युद्धजन्य परिस्थिती,बदलते हवामान पहाता अन्न-धान्याचे जतन करने अत्यंत गरजेचे आहे.कारण भारतात बालकांच्या कुपोषणाची स्थिती अत्यंत वाईट आहे.त्याचप्रमाणे मी सरकारला आग्रह करतो की अन्न-धान्याचा काळाबाजार ताबडतोब रोखला पाहिजे व जमाखोरांच्या प्रती कठोर पाऊल उचलुन त्यांच्या मुसक्या आवरल्या पाहिजे.तेव्हाच विश्र्व खाद्य दिवसाला खरे महत्व येईल.संपुर्ण जग एकीकडे खाद्यांनासाठी आठा-पीटा करून वन-वन हिंडत आहे तर दुसरीकडे संपूर्ण जग युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन बारूदच्या ढीगाऱ्यावर बसल्याचे दिसून येते.म्हणजेच आज जगात खाद्यान्ना पेक्षा दारूगोळ्याला जास्त महत्व दील्याजात आहे.याला कोठेतरी रोखलेच पाहिजे अन्यथा अनर्थ होवू शकतो.याकरिता जीवन जगण्यासाठी खाद्यांनाकडे प्रत्येक देशांनी तत्परता दाखवुन उपासमारी, कुपोषण,भुकमरी याला पुर्णविराम लावण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजे यातच जगाचे कल्याण आहे.जय हिंद.
रमेश कृष्णराव लांजेवार  

Previous article
Next article
व्हालीबॉल स्पर्धेत पी.एम श्री जि. प.मा.कन्या शाळेचा १७ वयोगटातील संघ जिल्हास्तरावर प्रथम १४ वर्षे वयोगटातील संघ उपविजेता माजलगाव प्रतिनिधी शेख हमीद महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा संचलनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये व्हालीबॉल स्पर्धेच्या जिल्हास्तरीय सामन्यात पी.एम श्री जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा माजलगाव येथील १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर सर्वप्रथम परळी संघाला हरवून अंतिम सामन्यात अंबाजोगाई संघासोबत १५-२५, १३-२५ ने दणदणीत विजय मिळवून प्रथम येत घवघवीत यश संपादन केले आहे.विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेत विजयी संघ बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. तर १४ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ उपविजेता ठरला आहे.विजयी संघाला प्रशिक्षक अब्दुल शेख व राजकुमार सोनपसारे यांचे मार्गदर्शन मिळाले.१७ वर्षे विजयी संघात कर्णधार अक्षरा पवार,शितल राठोड,सोमेश्वरी टाक,साक्षी कुलकर्णी,अंजली कुंभार,रूची दळवी,अनन्या चव्हाण,शितल वावळकर,पुनम राठोड,अलिना शेख या खेळाडूंचा समावेश आहे. या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी,तालुका क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, बीड तालुका क्रीडाधिकारी होसुरकर,क्रीडा संयोजक सचिन मोती,शेख शारेक,तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा फरहाना पठाण व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद गरबडे,सहशिक्षक मधुकर मकसरे, बाळासाहेब सोनसळे,शरद नायबळ,सुंदर काळे,नारायण भाळशंकर,चंद्रकांत यादव,बालासाहेब कांबळे,हनुमान शेरकर,सौदागर हसीब,सहशिक्षिका मंदा सारूक,संगीता राठोड,ज्योती कोडगीरकर,जयश्री लोणीकर,संगीता शिंदे,अंबिका कुचेकर,शितल राठोड,हिरा मगर,आसमा शेख, अनिता पौळ,गोरख उघडे,संतोष साळवे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments