प्रगती विद्यालय म्हणजे एम बी बी एस विद्यार्थ्यांची खाण
बीड प्रगती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, बीड शहरातील प्रगती विद्यालय, बालेपीर, बीड येथील शाळेने अल्पावधीत देश व राज्य पातळीवर विविध स्पर्धांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच आपला दबदबा निर्माण केलेला आहे.
तसे पाहिले तर प्रगती विद्यालय, बालेपीर, बीड परिसरात सन 1990 पासून मराठी माध्यमाची शाळा सुरू आहे. परंतु हा परिसर स्लम एरिया असल्यामुळे येथे बालेपिर परिसर, काकडहिरा, तळेगाव परिसरातील विद्यार्थी शाळेत येत होते. सेमी माध्यम नसल्यामुळे जवळच्या शाळेपासून लांबच्या शाळेत परिसरातील विद्यार्थी जात होते. ही खंत शिक्षकांना वाटत होती. त्यामुळे संस्थेचे संस्थापक माननीय रामकृष्णजी बांगर साहेबांना ही बाब मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी लक्षात आणून दिली. तेव्हा बांगर साहेबांनी मनावर घेऊन बीड शहरात संस्थेचे राहणारे सर्व कर्मचाऱ्यांची एक बैठक घेतली, आणि सांगितले की ज्याप्रमाणे लातूरला शाहू पॅटर्न आहे, तसेच आपल्या पण बीड शहरामध्ये प्रगती पॅटर्न सुरू करायचा आहे. ही माझी प्रबळ इच्छा आहे. असे सांगितले आहे. येथूनच म्हणजे शैक्षणिक वर्ष 2014-15 पासून आजपर्यंत एम.बी.बी.एस. साठी एकूण 95 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. म्हणजेच भावी डॉक्टरची निवड झालेली आहे. ते खालीलप्रमाणे 1)कवडे ओम नाना 2) बांगर प्राची महारूद्र 3) सावंत सायली संजय 4) माने संस्कृती प्रमोद 5)खोमणे वरद वैजनाथ 6) भंडाने रूपाली भरत 7) भोंडवे ओम अंगद 8) पवळ तृप्ती विकास शैक्षणिक वर्ष 2025 -2026मध्येवरील आठ भावी डॉक्टरांची निवड झाली
महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारे खालील विविध परिक्षेत यश :-
नवोदय परीक्षा, पाचवी व आठवी स्कॉलरशिप, आर्थिक दुर्बल घटक परीक्षा, एन टी एस परिक्षा ,डॉक्टर होमी भाभा, गणित, सायन्स , इंग्रजी ओलंपियाड परीक्षा, जूनियर आयएएस परीक्षा, एम टी एस इ, आकाश इत्यादी परीक्षा जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान प्रगती विद्यालयाला मिळालेला आहे तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत व चित्रकला ग्रेड परीक्षा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यालय अग्रेसर राहिलेला आहे त्याचबरोबर शैक्षणिक सहल धार्मिक ऐतिहासिक व भौगोलिक स्थळांना भेटी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना भौगोलिक क्षेत्रभेट दिले जाते त्यामुळे वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा पालकांचा
वरील सर्व गुणवंत यशवंत भावी डॉक्टर या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थापक माननीय रामकृष्णजी बांगर साहेब, सचिव सत्यभामाताई बांगर, बाळासाहेब बांगर, साहेब उपशिक्षणाधिकारी शेख जमीर साहेब केंद्रप्रमुख सोनवणे संभाजी साहेब शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब गोपाळघरे सर, दिलीप कंठाळे सर, अहमद शेख सर घोळवे सर, सानप सर, , ढवळे सर, जायभाय सर, कदम सर, वाघवाले सर, मस्के सर, ढाकणे सर, कंठाळे सर, नागरगोजे सर,चव्हाण सर, वाघवाले सर, अग्रवाल मॅडम, निकाळजे मॅडम, नांदगावकर मॅडम, सोनवणे परजने मॅडम काकडे मॅडम मुंडे मामा, केदार मामा व पालक वर्ग प्रगती व नवनिर्माण चे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.