Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादकन्नड पंचायत समितीत येणार महिला राज

कन्नड पंचायत समितीत येणार महिला राज

कन्नड पंचायत समितीत येणार महिला राज

कन्नड उदय कुलकर्णी – दि.13 तालुक्यातील जि.परिषदेच्या 8 गणांपैकी पंचायत समितीचे 4 गट महिलांसाठी राखीव झाले आहेत.
सोमवार दि.13 रोजी दुपारी ठीक 12 वाजता कन्नड तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांचे अध्यक्षतेखाली एका 10 वर्षीय शे.मुसद्दीक शे.मुजक्कीर याने चिट्ठी काढून पुढील प्रमाणे आरक्षण काढण्यात आले.त्यात नागद,कुंजखेडा,हतनूर हे गट सर्वसाधारण महिलांसाठी तर करंजखेडा,लिं.चिंचोली,पिशोर,व देवगाव( रं.) हे सर्वसाधारण गट महिलांसाठी म्हणून जाहीर करण्यात आले आहे.एकूण 16 गटांपैकी सहा गण सर्वसाधारण महिलांसाठी तर तीन गण ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेमुळे या गणातील पुरुष ईच्छुकांचा पार हिरमोड झाल्याचे दिसून आले.तसेच जेहूर हा गण (एसटी ) साठी तर औराळा हा गण (एससी ) साठी आरक्षित झाल्याने या ठिकाणीही विविध पक्षाकडुन सक्षम उमेदवार शोधावा लागणार हे निश्चित आहे.
सदर आरक्षण सोडतीनुसूर जेहूर (एसटी )औराळा (एस्सी,) ,चापानेर व निंभोरा ( ओबीसी )लिं.चिंचोली व घाटशेंद्रा  (ओबीसी.) महिला,चिकलठाण, नागद,पिशोर,करंजखेड,अंधानेर,नाचनवेल हे गण सर्वसाधारण महिलासाठी राखीव तर देवगाव (रं.) ,ताडपिंपळगाव कुंजखेडा,
हतनूर,हे गण सर्वसाधारण साठी अरक्षित म्हणून निघाले आहे.
या सोडत प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री.संतोष गोरड यांचे समवेत तहसीलदार विद्याचरण कडवकर,गट विकास अधिकारी डॉ.ओमप्रकाश रामावत,नायब तहसीलदार श्री.दिलीपकुमार सोनावणे,नायब तहसीलदार श्री.प्रशांत काळे,शे.बेग हे अधिकारी गण उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments