ओबीसी आरक्षण आंदोलन आणि पत्रकारिता-राजाराम पाटील
विद्येविना मती गेली..ओबीसींच्या गुलामगिरी मागचे सत्य महात्मा जोतिबा फुले यांनी सागितले.त्याचबरोबर त्या गुलामगिरीवरचा उपाय हा स्त्री शिक्षण आहे हे सांगून ते थांबले नाहीत.त्याची सुरुवात आपल्या घरातून केली.आमचे गुरू म्हणून किती ओबीसी जातींनी हा सावित्री जोतिबाचा शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे?.ओबिसिनी आपल्याकडील सारा पैसा कधी मुलींच्या शिक्षणास लावला आहे का?.उत्तर नाही.असेच आहे.
ओबीसींच्या आठशेहून अधिक जाती आहेत.म्हणजेच ८६१ जाती आहेत.असे आमचे बंधू प्रा.मनोहर धोंडे सांगतात.यातील मी आगरी कोळी, कराडी,भंडारी, कुणबी, माळी या कोकणातल्या ओबीसी जातीना हा प्रश्न विचारतो.किती घरात आज पदवीधर मुली,बहीण,पत्नी,आई,मावशी,आजी,काकी आहेत?.स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्यावर मनुस्मृतीच्या हिंदू उच्चवर्णीयांनी लादलेल्या गुलामी वर स्त्री शिक्षण हाच उपाय आहे.आज ओबीसी आरक्षणाची लढाई लढताना,आम्ही किती स्त्रियांचे नेतृत्व उभे करू शकलो?.जोपर्यंत भारतीय स्त्री या शूद्र ओबीसींच्या गुलामगिरी विरुद्ध उभी राहत नाही.तोपर्यंत आम्ही स्वातंत्र्याचा अनुभव घेत नाही.आजही समस्त ओबीसी संघटना,राजकीय पक्ष,विचारमंच हे स्त्री विरोधी म्हणजेच पुरुषसत्ताक म्हणजेच मनुवादी असतील ?.तर समता,आरक्षण,शिक्षण प्रबोधन हे खूप दूर आहे.
हिंदू वैदिक ब्राह्मणी धर्माची गुलामगिरी आमच्या ओबीसी जातींमध्ये कशी घट्ट रुजली आहे.हे आपल्या लक्षात येते.ती दूर करण्याचे आंदोलन आपल्या घरातूनच सुरू होते. हे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी आम्हास दिलेला आदर्श आहे.महात्मा जोतिबा फुले यांना महात्मा ही उपाधी मुंबईतल्या आगरी कोळी भंडारी यांनी दिली.त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील,ओबीसी नेते दि बा पाटील,ॲड दत्ता पाटील यांनी गुरु मानले.या सर्वांनी आपापल्या काळात शिक्षण चळवळीचा,वृत्तपत्रे काढून रोज आपल्या लोकांसाठी प्रबोधन पर लिहिण्याच्या महात्मा फुले सावित्री माईंचा विचार पुढे आणला. शिक्षण वाचन लेखन वक्तृत्व पत्रकारिता हे माणूस घडविण्याचे आधुनिक साधन आहे.ही गोष्ट आमच्या नेतृत्वाने सांगितली.आम्ही आत्मसात केली नाही.आमचे पारंपरिक शत्रु ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी त्या लोकशाहीच्या बलस्थानावर आज कब्जा केला आहे.शिक्षण वाचन लेखन प्रसार माध्यमांचे आधुनिक स्वरूप म्हणजे आमच्या हातातील आमच्या मालकीचे मोबाईल आहेत.ते आमच्या हितासाठी कसे वापरायचे? हे ही आम्हास कळत नसेल? तर आम्हीच आमचे शत्रू आहोत.हे सिद्ध होत आहे.
ओबीसी जातीना आपले मनुवादी शत्रू समजून येऊ नये.यासाठी सोशल मिडिया, शालेय शिक्षण,पत्रकारिता यात इतिहास बदलण्याचा कार्यक्रम उच्च जातीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी सुरू केला आहे.ज्यांनी ओबीसींचे शोषण केले ते ब्राह्मण सांगत आहेत .आम्ही गरीब झालो.वस्तुस्थिती अशी आहे.देशाच्या सर्व मंदिर,जमिनी धर्म सत्ता,राजकीय सत्ता यावर एकत्रितपणे सत्ता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची आहे.आज या उच्चजातीय लोकांसाठी घटनाबाह्य EWS हे आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षण दिले गेले.याच प्रमाणे जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनास अनुकूल निर्णय घेऊन कुणबी दाखले देण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा ओबीसी आरक्षण संपविण्याचा निर्णय आहे.हे आम्ही ओबीसींना समजवण्यात कमी पडत आहोत.जे या देशातील शोषक आहेत. ते आज आरक्षण मागत आहेतं.म्हणजेच चोरांच्या उलट्या बोंबा आहेत.हे बोलणारा प्रबोधनकार नसल्यामुळे सर्वत्र उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा आरक्षणाच्या मुक्त चर्चा चक्क मा उच्च न्यायालयात सुरू आहेत.जुलमी सनातनी मागास वर्गीय लोकांतून सरौच्च ठिकाणी म्हणजे सुप्रीम कोर्टात सर न्यायाधीश पदी बसूनही सन्माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर,चप्पल फेकणारे ही उच्चजातीय सनातनी मंडळी उघडी करणारी लेखणी आमच्या कडे नाही.
देशाचे पंतप्रधान मी ओबीसी आहे.असे सागून,ओबीसी विरोधी निर्णय घेतात.आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन ते करीत आहेत.परंतु एका शूद्र ओबीसी नेत्याचे नाव म्हणजेच दि बा पाटील यांचे नाव ते देत नाहीत.ज्या ओबीसी आगरी कोळी कराडी या शेतकरी मच्छीमार प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी,नवा भूसंपादन कायदा नाकारून घेतल्या.तो विमानतळ उच्चवर्णीय अदानी ला दिला.ही फसवणूक आम्ही आमच्याच लोकांना सांगू शकत नाही.येथे आलेला मोदींच्या वैश्य जातींचा व्यापारी आमदार महेश बालदि पुनर्वसन झाले.असे चक्क खोटे बोलतो.मा उच्च न्यायालय सांगते अडाणी अशिक्षित शेतकरी यांच्याकडून संमती पत्रे लिहून घेऊन GR द्वारे घेतल्या गेलेल्या जमिनी ही आमची फसवणूक आहे.जमिनी भूसंपादन कायदा २०१३ नुसारच घ्याव्यात हे कायदा सांगतो.त्याविरोधात आमदार कसे बोलू शकतात?
देवेंद्र फडणवीस सांगतात.त्यांचा ब्राह्मण DNA हा ओबीसी शूद्र आहे.मग तुम्ही ओबीसींना ब्राह्मण जातींचे दाखले देऊन शंकराचार्य कराल का? तिकडे जरांगे सांगतात.आम्ही शूद्र शोषित कुणबी झालो.आम्हाला ओबीसी आरक्षण द्या.या निर्लज्ज,अस्तित्वहीन चर्चा समजून घेण्यासाठी विषमते विरुद्ध लिहिलेले साहित्य वाचायला हवे.जे फुले शाहू आंबेडकर यांनी लिहिले आहे.ते ओबीसी सभा संमेलने यात विक्रीस असते काय?. मुळात ओबीसी नेते कार्यकर्ते आरक्षणास कारण असलेली, ब्राह्मण मराठा वैश्य यांची काळीकुट्ट शोषक माहिती कधी लोकांसमोर आणतात का?
ओबीसी बांधवांनी किमान आपले मोबाईल नव्या समतेच्या साविधानिक समतेच्या अभ्यासासाठी वापरले पाहिजेत.आपल्या नेतृत्वाची भाषणे सभांमध्ये रेकॉर्ड केली पाहिजेत.ओबीसी ना स्वतःचा मिडिया नाही.खिशात असलेला मोबाईल जे प्रबोधनासाठी वापरत नाहीत.हा माझा अनुभव आहे.अर्थात जेव्हा आमच्या आजी आजोबांना पाटी खडू नाकारणारी सरस्वती होती.तेव्हा शेणाचे गोळे अंगावर घेत धाऊन आलेली सावित्री आठवा.आज हातात चित्रीकरण करू शकणारा,लेख बातम्या टाइप करू शकणारा,बोलणारा चर्चा करणारा मोबाईल हाती असतानाही आम्ही गुलाम असू तर दोष कुणाचा?.आमचाच ना?
जय ओबीसी.
-राजाराम पाटील