पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न
पैठण/ पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित प्राचार्य डॉ.शिवानंद सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमावेळी डॉ.प्रभाकर कुटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ. रमाकांत तिडके, उपप्राचार्य प्रा.वैजनाथ चाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.विजयकुमार वैराटे तर आभार डॉ. महानंदा राऊत यांनी आभार मानले.यावेळी प्रो.राजेश करपे,डॉ.डी.आर.देशमुख डॉ.मजिद शेख,डॉ. किरण गायकवाड,डॉ. मधुकर बैकरे आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती हाेती.