Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादएमजीएम विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न पद्मविभूषण प्रो.एम.एम.शर्मा यांना...

एमजीएम विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न पद्मविभूषण प्रो.एम.एम.शर्मा यांना डी.एसी पदवी प्रदान विद्यापीठाच्या १९६० विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण

एमजीएम विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

पद्मविभूषण प्रो.एम.एम.शर्मा यांना डी.एसी पदवी प्रदान

विद्यापीठाच्या १९६० विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण

छत्रपती संभाजीनगर/  आपण स्वत: ला प्रश्न विचारायला हवेत कारण प्रश्न विचारण्याने ज्ञानात भर पडत असते. आपण कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी मूल्य जपत, आपण आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन यशस्वी कराल, या सदिच्छेसह मी सर्वप्रथम सर्व पदविधारकांचे अभिनंदन करतो. आपण समकालीन काळातील आपली पिढी आपल्या जीवनकाळात भारताला परिपूर्ण विश्वगुरु बनवाल, हा विश्वास मला वाटतो, असे प्रतिपादन साऊथ एशियन विद्यापीठाचे अध्यक्ष प्रो.के.के.अग्रवाल यांनी यावेळी केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ आज एमजीएम स्पोर्ट्स स्टेडियम येथे साऊथ एशियन विद्यापीठाचे अध्यक्ष प्रो.के.के.अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी दीक्षांत भाषण करीत विद्यार्थ्यांना संबोधित केले.

यावेळी, पद्मविभूषण प्रो.एम. एम. शर्मा, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ.पी.एम.जाधव, डॉ.नितीन कदम, डॉ.अमरदीप कदम, भाऊसाहेब राजळे, डॉ.रणजीत कक्कड, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. शशांक दळवी, डॉ.हरिरंग शिंदे, डॉ.प्राप्ती देशमुख, डॉ.रेखा शेळके, डॉ. जॉन चेल्लादुराई, प्रा.पार्वती दत्ता, डॉ.रणीत किशोर, डॉ. विजया मुसांडे, डॉ.परमिंदर कौर, मुख्य वित्त लेखा अधिकारी राशी जैन, शुभा महाजन, विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, विद्वत परिषद, विविध प्राधिकारणीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे विभाग प्रमुख, संस्थांचे संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्व संबंधित उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रो.के.के.अग्रवाल म्हणाले,  आज आपणा सर्व विद्यार्थ्यांना पद्मविभूषण प्रो.एम.एम.शर्मा यांच्यासमवेत पदवी प्राप्त होत आहे, हे आपल्या सर्वांच्या आयुष्यभर लक्षात राहील. आजच्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अधिक विद्यार्थी मुली आहेत, ही निश्चितपणे आनंदाची बातमी आहे. एमजीएम विद्यापीठ हे आंतरविद्याशाखीय आणि बहूविद्याशाखीय शिक्षण देणारे एक उत्तम विद्यापीठ असून या विद्यापीठातून आज पदवी घेणारे आपण सगळे विद्यार्थी भाग्यशाली आहात.

आज मला एमजीएम विद्यापीठाने मानद डीएससी पदवी दिल्याबद्दल मी विद्यापीठाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. मी ३३ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. आपण ज्या संस्थेत शिकलेलो असतो त्या संस्थेबद्दल कायम कृतज्ञता बाळगत जीवनाचा प्रवास केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण कायम आपले ज्ञान वाढवत त्यास अद्ययावत करत राहिले पाहिजे. विशेषत : आपण ज्याही क्षेत्रात काम करणार असाल त्या क्षेत्रात नैतिक मूल्य जपत काम करा, असे यावेळी पद्मविभूषण प्रो.एम.एम.शर्मा यांनी सांगितले.

कुलपती अंकुशराव कदम यावेळी बोलताना म्हणाले, आजच्या दिवशी ज्यांच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे, अशा एमजीएम विद्यापीठातील सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आपण खूप मोठे व्हा, खूप प्रगती करा! आपल्या वाणीने, आपल्या शरीराने कोणालाही दुखवायचे नाही आणि यामुळे कोणाला सुख देता आले तर देत आपले चित्त नेहमी स्वच्छ ठेवायचे. येणारा प्रत्येक क्षण हा आपला आहे, त्या  क्षणाचे तुम्ही मालक आहात. यावेळी जे बीज आपण पेरणार आहोत त्याच बिजाला भविष्यात फळे येणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी जागरूक राहत आपला पुढचा यशस्वी प्रवास करावा.

एमजीएम विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी केलेली आहे. आज सर्वच क्षेत्रामध्ये विद्यापीठाने यशस्वीपणे प्रगती केलेली आहे. एमजीएम हे मराठवाड्यातील पहिले स्वयं अर्थसाहाय्यित खाजगी विद्यापीठ असून २०१९ पासून कार्यान्वित झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने एमजीएम विद्यापीठाला २ (एफ) दर्जा दिलेला आहे. येथे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मूलभूत आणि उपयोजित विज्ञान, व्यवस्थापन आणि वाणिज्य , सामाजिक शास्त्रे आणि मानव्य विद्या, प्रयोगकला विद्याशाखा, आंतरविद्याशाखीय शिक्षण, फॅकल्टी ऑफ डिझाईन या विद्याशाखांतील विद्यार्थ्यानी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम आणि प्रतिभासंपन्न कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एमजीएम विद्यापीठाने विविध शैक्षणिक, औद्योगिक संस्थांशी सामंजस्य करार केले असल्याचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

दीक्षांत समारंभामध्ये एमजीएम विद्यापीठातून २०२४ -२०२५ या शैक्षणिक वर्षामध्ये विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या दीक्षांत समारंभात विद्यापीठातील ७ विद्याशाखांच्या विद्यावाचस्पती पदवी (Ph.D) – ४३, पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) – ३९३,  पदवी (Undergraduate Degree) – १३९५, पदव्युत्तर पदविका (Post Graduate Diploma) – २४, पदविका (Diploma) – ८३ आणि प्रमाणपत्र (Certificate) – १५ विद्यार्थ्यांचा समावेश असेल. यापैकी ६५५ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (Engineering & Technology), ५२७ मूलभूत आणि उपयोजित विज्ञान (Basic & Applied Science), ४३१ व्यवस्थापन आणि वाणिज्य (Management & Commerce) , २३२ सामाजिक शास्त्रे आणि मानव्य विद्या (Social Sciences & Humanities), १८ प्रयोगकला विद्याशाखा ( Performing Arts), २१ आंतरविद्याशाखीय शिक्षण (Interdisciplinary Studies), ७६ फॅकल्टी ऑफ डिझाईन (Faculty of Design) विद्याशाखेचे विद्यार्थी होते. अशा विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या एकूण १९६० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments