काँग्रेसचा फुलंब्री तहसील कार्यालयासमोर आंदोलन,
तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री तालुक्यात कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी झाल्याने पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी काँग्रेस तालुका कमिटीच्यावतीने फुलंब्री तहसील कार्यालयासमोर बुधवारी (दि.२४) अर्धा तास ठिय्या मांडत तहसीलदार योगीता खटावकर यांना निवेदन दिले.
फुलंब्री तालुक्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले
आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता तालुक्यात सरसगट
करून घ्यावेत, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची
याप्रसंगी जिल्हा बँकचे संचालक जगन्नाथ काळे, तालुकाध्यक्ष संतोष मेटे, जिल्हा दूध संघाचे संचालक संदीप बोरसे, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष बाबुराव डकले, ज्ञानेश्वर जाधव, गणेश काळे, इद्रीस पटेल, फैय्याज शहा, देविदास ढंगारे, मुदस्सर पटेल, प्रशांत नागरे, रज्जाक शेख, आजीनाथ सोनवणे, सदाशिव विटेकर, सुरेश मुळे, रेखा वहाटुळे, दिक्षा पवार, गणेश पवार, मुकेश चव्हाण, पंढरीनाथ जाधव, अंबादास गायके, आजीनाथ जोगदंडे, आकाश गायकवाड, भाऊसाहेब क्षीरसागर, कारभारी वहाटुळे, सोमीनाथ मते, विठ्ठल कोलते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सर्व मंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा. या अतिवृष्टीत फक्त शेतकरीच नव्हे तर फुलंब्री शहर तसेच फुलंब्री – खुलताबाद रस्त्यावरील फुलंब्री टी पॉइंटवरील दुकानात पाणी शिरून व्यापारी बंधूंना आर्थिक फटका बसला आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचे तात्काळ पंचनामे
मदत करावी अशी मागणी निवेदनातून आंदोलकांनी केली. फुलंब्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली फुलंब्री तालुक्यात मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.