Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादराऊत, उबाठा गटाची लेना बँक आहे; महायुती सरकारची देना बँक

राऊत, उबाठा गटाची लेना बँक आहे; महायुती सरकारची देना बँक

राऊत, उबाठा गटाची लेना बँक आहे; महायुती सरकारची देना बँक

भाजपा, महायुतीच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन बळीराजासाठी

भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे प्रतिपादन

भाजपा – महायुती सरकार हे पूरग्रस्त भागातील शेतक-यांसोबत असून कोणत्याही निकषाविना सर्वतोपरि मदत करण्यासाठी कटीबद्ध आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व आमदार, खासदारांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अतिवृष्टीग्रस्त भाग आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहे. मात्र संजय राऊत, उबाठा गटाचे  लोकप्रतिनिधी स्वत:च्या खिशातून एक दमडी शेतक-यांना न देता वायफळ बडबड करत आहेत, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी खा. संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी  झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यातील अडीच हजार कोटींची मदत 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात आणखी मदत दिली जाणार आहे. राऊत आणि उबाठा यांनी जनता, शेतकरी आणि मुंबईकरांना लुटून स्वत:चे खिसे भरण्याचे पाप केले. राऊत  उबाठा गटाची ‘लेना बँक आहे तर भाजपा- महायुतीची देना बँक आहे’, असेही श्री. बन म्हणाले.

यावेळी श्री. बन म्हणाले की, भाजपा महायुती सरकार शेतक-यांच्या दु:खात सहभागी असून सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहून मदतीचा हात पुढे करत आहे. उलट महाविकास आघाडीचे नेते एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत, फक्त बसून गप्पा मारत आहेत. श्री. राऊत हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत कशी करावी यावर शहाजोगपणे सल्ले देत आहेत. सत्तेत असताना अडीच वर्षांत साडेनऊ लाख कोटी रुपयांची लूट करणाऱ्या उबाठा गटाने आणि राऊतांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. एवढा पैसा खिशात गेला तर किमान 20 हजार कोटी मराठवाड्यातील ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले पाहिजेत असा बोचरा सल्लाही श्री. बन यांनी दिला.

आधी काँग्रेस आमदारांना पूरग्रस्तांसाठी वेतन देण्यास भाग पाडा!

शेतकऱ्यांसाठी महायुतीने तातडीने अडीच हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, याची खात्री सरकारने दिली आहे. मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आमदार अजूनही निष्क्रीय आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी  काँग्रेस आमदारांना पूरग्रस्तांसाठी वेतन देण्यास भाग पाडावे  असे आव्हान श्री. बन यांनी दिले.

रोहित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेत श्री. बन म्हणाले की, त्यांनी सरकारला जाब विचारण्याआधी स्वतःचे आजोबा शरद पवार दहा वर्षे कृषिमंत्री होते, तेव्हा शेतक-यांची स्थिती दयनीय होती, सर्वाधिक आत्महत्या त्या काळात झाल्या होत्या. पवारांनी तेव्हा शेतकरी हितासाठी काय काम केले ? रोहित पवार यांना जाब विचारायचा असेल तर तो त्यांनी आधी सिल्वर ओकवर जाऊन आजोबांना  विचारावा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments