वित्तीय साक्षरता मेळावा तसेच आर केवायसी मेळावा संपन्न
देगलूर/प्रतिनिधी/ महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत व क्रिसील फाउंडेशन यांच्या माध्यमातून देगलूर तालुक्यातील खुतमापूर येथे वित्तीय साक्षरता मेळावा तसेच केवायसी मेळावा घेण्यात आला. बचत गटातील महिला सीआरपी उपस्थित होते. लक्ष्मीताई दत्ता ठाकूर आणि वंदना वाघमारे तसेच गावातील सरपंच बालाजी चोपडे हे उपस्थित होते. आणि सर्व बचत गटातील महिला उपस्थित होते. तरी सर्व महिलांना बँकेविषयी आर केवायसी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा,जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन,डिजिटल व्यवहार, तक्रार निवारण प्रणाली,बँक,लोन,शासकीय योजनांची माहिती क्रिसिल फाउंडेशनच्या संगीता ताई वाघमारे यांनी सविस्तर माहिती दिली.
