Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादयेरगी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास सुरूवात

येरगी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास सुरूवात

येरगी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास सुरूवात

देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन ऐतिहासिक नगरी येरगी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे आणि मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून ग्राम सभा घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात करण्यात आली.या अभियानाचे उद्घाटन बालिका पंचायत राज चे सरपंच कु.अंजली वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन येरगी येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करून ग्राम स्वच्छता,रस्ते दुरुस्ती,पाणंद रस्त्यांना प्राधान्य देणे,ग्राम पंचायत सक्षम करण्यासाठी कर व पाणीपट्टी वसुली करणे, लोकवर्गणीद्वारे जनतेला सुविधा उपलब्ध करून देणे,पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे,बचत गट, शेतकरी उत्पादक संस्थेमध्ये महिलांचा सहभाग घेणे, ग्रामपंचायत ,शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय उपचार केंद्र,आरोग्य उपकेंद्र मध्ये सुविधा उपलब्ध करून देणे,धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे सुशोभीकरण करणे,जल समृद्धी ,स्वच्छ व हरित गाव,वृक्ष लागवड ,प्लास्टिक बंदी आणि घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे या बाबींची चर्चा करण्यात आली.
ग्रामसभेत सर्व उपस्थितांना मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान विषयी प्रोजेक्टरवर माहिती दाखविण्यात आली, यासच राज्याचे मुख्यमंत्री यांचे लाईव्ह भाषण दाखवण्यात आले. यावेळी सर्वानी लोकसहभागातून चळवळ उभी करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा एकमुखाने प्रस्ताव मांडण्यात आला.
ग्रामसभेनंतर गावात रॅली काढण्यात येऊन सदरील अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला.यामध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना याविषयी माहिती दिली.
या ग्रामसभेत संतोष पाटील,सौ.संगीता मठवाले, तलाठी रूषीकेष म्हेत्रे, कृषी सहायक पांडुरंग मैलारे, तालुका तज्ञ व्यवस्थापक संजय आचमारे, आरोग्य उपकेंद्राचे डाॅ.किरण ठाकरे, श्रीमती अनिता असनेवाड,ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे ,विश्वनाथ बागेवार,मारोती तलारवार,अशोक बरसमवार,कोंडाबाई वाघमारे,सुशिलाबाई सोमावार ,विठाबाई बरसमवार,तंटामुक्ती अध्यक्ष सायलू कांबळे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गजानन भोकसखेडे,मुख्याध्यापक अशोक देवकत्ते,बालिका पंचायत चे महादेवी कुंचगे,मोनिका पाटील,रुक्मिणी भुरळे बचत गटाचे मैनाबाई वाघमारे,संतोष काब्दे,रुपाली जाधव,ग्राम पंचायत कर्मचारी माधव इज्जरवार,प्रभाकर वाघमारे,मल्लिकार्जुन मठपती,आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments