Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादआशा जीव्हाळा व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची आज महाराष्ट्राला सद्या गरज आहे

आशा जीव्हाळा व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची आज महाराष्ट्राला सद्या गरज आहे

आशा जीव्हाळा व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची आज महाराष्ट्राला सद्या गरज आहे

“जागेवरच दिली शहीद जवानाच्या वृद्ध  माता पित्यास शिधापत्रिका”
कन्नड/ कन्नडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर नुसते पदावरच नही तर त्यांच्या कार्यालयात प्रत्येक दिवशी कामानिमित्य आलेलेल्या तालुक्यातील प्रत्येकाचे काम ते क्षणाचाही विलंब न लावता हातावेगळे करतांना दिसून येत आहे.असाच काहीसा प्रसंग नुकताच घडला असुन मौजे औराळा गावातील शहीद जवान सुनील उत्तमराव जाधव  ( कारगिल युद्धात)  देश सेवा करतांना दोन वर्षांपूर्वी शहीद झाला होता.काही दिवसापूर्वी त्याची पत्नीही स्वर्गवासी झाली होती.त्यातच घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व बेताची असल्याने व घरात वृद्ध आई वडील नव्वदीचे आसपास असल्याने त्यांचेकडून कुठलेही काम होत नव्हते.त्यात त्यांना शिधा पत्रिका नसलेमुळे रेशनही मिळत नव्हते म्हणून गेल्या अनेक दिवसापासून ते दोघे तहसील कार्यालयात शिधापत्रिका मिळावी म्हणून ये जा करीत होते.सदर माता पित्याकडे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांची नजर जाताच त्यांनी त्यांचेकडे अस्ताविकपणे विचारणा केलीअसता, सदर वृद्ध माता पित्यांनी त्यांच्या अडचणी बाबद त्यांना सांगितले असता तहसीलदार कडवकरांनी त्यांना आपल्या केबिनमध्ये नेऊन शांत केले.व क्षणाचाही विलंब न लावता सर्व चक्रे फिरवून जागेवरच त्यांना प्राधान्य कुटुंब म्हणून शिधापत्रिका देऊन शासनाच्या अन्नधान्य वितरणाचा लाभ तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वृद्ध पेन्शन योजना या दोनही शासन योजनेचा लाभ मिळवून दिला.या प्रसंगी शहीद जवानांच्या माता पित्याच्या डोळ्यात आनंदाश्रू मावेनासे  झाले होते.इतकेच काय सदर ठिकाणी उपस्थित नागरीकांच्याही भुवया पाणवल्याच्या दिसून आल्या.यावेळी तहसीलदार कडवकर, पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी निलेश राठोड,नायब तहसीलदार विजयकुमार सोनावणे,तलाठी दिपक एरंडे हे उपस्थित होते.त्यामुळेच गोरगरिबांच्या व्यथा जाणून त्या  चुटकी सरशी सोडविणाऱ्या व त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्याआपल्या सारख्या अनेक अधिकाऱ्यांची या महाराष्ट्राला आज नितांत
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments