निधन वार्ता 
वैजापूर/प्रतिनिधी/ वैजापूर येथील तिळवण तेली समाजातील ज्येष्ठ महिला गंगाबाई पंढरीनाथ क्षीरसागर यांचे वयाच्या ९२व्या वर्षी  बुधवारी राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैजापूर येथील अमरधाम मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले , तीन मुली,सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.नगरपालिकाचे सेवा निवृत्त कार्यालयीन अधीक्षक रघुनाथ क्षीरसागर व केदार शिरसागर यांच्या त्या मातोश्री होत.