मुख्याधिकारी भागवत बिघोत यांचा सत्कार
वैजापूर/प्रतिनिधी/ वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक
भागवत बिघोत यांनी लद्दाख येथील मॅरेथॉन स्पर्धेत
सहभाग घेऊन पारितोषिक पटकावले. त्यांनी वैजापूर शहरासह महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कौतुकास्पद कामगिरी केली. शहरातील भारत नगर परिसरात त्यांचा गुरुवारी राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष
व नागरिकांचे वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अमर चाऊस, जागीरदार सोसायटीचे संचालक अकबर पाशा, अन्वर पाशा यांच्यासह
परिसरातील नागरिक उपस्थित होते.