Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात

महिला कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न

नाशिक/प्रतिनिधी/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स व बीव्हीजी यांच्या मार्फत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न झाली. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी), सातपूर कार्यालय यांच्या मार्फत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

विद्यापीठाच्या यश इन इमारतीत झालेल्या या शिबिराचा ६० हून अधिक महिला कर्मचारी वर्गाने लाभ घेतला. महामंडळाच्या नोडल अधिकारी डॉ. सरोज जावडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. स्मिता दहेकर (स्त्रीरोगतज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा शंकपाळ, डॉ.प्रेरणा पवार यांच्या पथकाने तपासणी केली. त्यात प्रामुख्याने महिलाचे वजन, रक्तदाब व रक्त आदींची तपासणी करत आवश्यकतेनुसार गरजू महिलांना औषधी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. सरोज जावडे, महाज्ञानदीप प्रकल्प संचालक प्रा. गणेश लोखंडे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी विद्यापीठ सेवासुविधा प्रमुख श्री. सुनील निकम, श्री. संतोष सोनार, श्री. तुकाराम पाटील, महामंडळाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. विशाल सानप, प्रवीण देवरे आदींनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया :- विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गाची नियमित आरोग्य तपासणी विद्यापीठ प्रशासनातर्फे केली जाते. तसेच आरोग्य प्रबोधनपर व्याख्याने व उपक्रमही आयोजित केले जातात. ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) ने या आरोग्य तपासणीसाठी केलेले सहकार्य अनमोल आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments