Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादपिशोर चिंचोली नाचनवेल परिसरात जोरदार पावसामुळे नदीनाल्याला पुर आल्यामुळे शेतीचे नुकसान

पिशोर चिंचोली नाचनवेल परिसरात जोरदार पावसामुळे नदीनाल्याला पुर आल्यामुळे शेतीचे नुकसान

पिशोर चिंचोली नाचनवेल परिसरात जोरदार पावसामुळे नदीनाल्याला पुर आल्यामुळे शेतीचे नुकसान

कन्नड/प्रतिनिधी/  कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी पिशोर नाचनवेल मंडळात सोमवार, मंगळवारी रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला होता. पुराचे पाणी वाकी पुलावरुन वाहत असल्याने चाकीचा काही तास संपर्क तुटला होता. दरम्यान, नदीचे पाणी आजू-बाजूच्या शेतात शिरल्याने अनेकांच्या पिकाचे नुकसान झाले. तर कन्नड तालुक्यातील पुर्णा, नेवपूर अंजना पिशोर प्रकल्पासह लघु मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.कन्नड तालुक्यातील पिशोर नाचनवेल चिचोली लिबाजी मंडळातील अनेक गावांना सोमवारी व मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले, ढगफुटीसदृश्य पावसामुळे चिंचोली लिबाजी पिशोर नाचनवेलसह सारोळा आमदाबाद नादरपुर पिंपरखेडा जवखेडा नेवपूर, घाटशेंद्रा, वाकी,  टाकळी अंतूर, बरकतपुर, लोहगाव, आदी अंजना नदीच्या काठावर असलेल्या पिशोर शफेपूर गावात पाणी शिरल्याने संपूर्ण परीसर जलमय झाले होते. तसेच अंजना नदीला पूर आल्याने पुराचे पाणी पिशोर कोळंबी पुलावरुन वाहत असल्याने कोळंबी तांडा भारंबा गावचा व पिशोर ते भिलदरी पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे मंगळवारी अनेक गावांशी संपर्क तुटला होता, त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान तालुक्यात शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले मक्का कपाशी अद्रक ईतर पिक भुईसपाट झाले कन्नड तालुक्यातील अंजना प्रकल्पासह इतर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. पुढील तीन ते चार दिवस हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला असून अंजना नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी नदीपात्रापासून दूर रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले अंजना नदीला पूर आल्यामुळे नादरपुर येथील स्मशानभूमीत पाणी शिरले शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments