Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबाद‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान; दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर...

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान; दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान;

दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम

छत्रपती संभाजीनगर – महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष राष्ट्रीय अभियान दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात  येणार आहे.

      महाराष्ट्रातील राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा दि.१७ रोजी  मुंबई येथे यशवंतराव चव्‍हाण सेंटर, रंगस्‍वर सभागृह नरिमन पॉईंट येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, राज्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्‍यात आला आहे. राज्यभरात त्याच दिवशी प्रत्येक जिल्हा व महापालिका स्तरावर महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

अभियानाची उद्दिष्ट्ये- 

  • या अभियानाचा मुख्य उद्देश देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महिला आणि मुलांसाठी तपासणी व

   विशेषज्ञ आरोग्य शिबिरांचे आयोजन

  • आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये दररोज (AAM-SHC) तपासणी आणि जनजागृती शिबिरांचे आयोजन
  • ग्रामीण रुग्‍णालये / उपजिल्‍हा रुग्‍णालये  (CHCs) आणि प्राथमिक आरोग्‍य केंद्रे (AAM-PHC/UPHC) येथे

  विशेषज्ञाव्‍दारे तपासणी शिबिरांचे आयोजन

  • खासगी  महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना संलग्‍नीत रुग्‍णालये व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे

या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा पुरवल्या जातील, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

१. महिलांची आरोग्‍य तपासणी:-

  • उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्‍या निदानासाठी तपासणी करणे.
  • तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्‍या निदानासाठीची  तपासणी करणे.
  • जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग (Tuberculosis) तपासणी.
  • किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन.
  • आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल

   आजाराबाबत समुपदेशन.

२. माता आणि बाल आरोग्‍य सेवा

  • गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी (ANC) तपासणी व समुपदेशन.
  • हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन.
  • बालकांचे आवश्‍यकतेनुसार लसीकरण

३. आयुष सेवा

  • या अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्‍द व नॅचरोपॅथी इ. पर्यायी उपचार पध्‍दतींची सेवा गरजू

  रुग्‍णांना उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.

४. जनजागृती आणि वर्तणूक बदल संवाद

  • किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे
  • महिला बचत गट (SHGs) आणि पंचायत प्रतिनिधींच्या माध्यमातून खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी

   करण्यावर समुपदेशन.

  • पोषण विषयी समुपदेशन व निरोगी राहण्‍यासाठी मार्गदर्शन

५. रक्तदान शिबीरे

  • १ ऑक्‍टोबर हा राष्‍ट्रीय स्‍वेच्‍छा रक्‍तदान दिन असून त्‍याअनुषंगाने राष्‍ट्रीय महास्‍वेच्‍छा रक्‍तदान या अभियानात

   राबविण्‍यात येईल. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद इ. संस्‍थांच्‍या साहायाने

   १ लाख युनिट रक्‍त गोळा करण्‍याचे ध्‍येय असून, रक्‍तदात्‍यांची नोंदणी करण्‍याचेही प्रस्‍तावित आहे. My Gov.

   Portal द्वारे रक्‍तदान प्रतिज्ञा उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल.

६. नोंदणी आणि कार्ड वाटप

  • आयुष्‍यमान भारत डिजीटल मिशन कार्ड (ABDM),  पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत नोंदणी

   व  आयुष्‍यमान वय वंदना कार्ड वाटप सर्व गरजू व पात्र लाभार्थ्‍यांना करण्‍यात येईल.

७.क्षयरोग निर्मुलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी

  • क्षयरुग्‍णांना दत्‍तक घेऊन त्‍यांना पोषक आहार उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी आणि क्षयरोगाविरुध्‍द जन

  आंदोलनाला पाठींबा देण्‍यासाठी दानशुर व्‍यक्‍ती, संस्‍था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी

  होण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले जाईल. याकरिता माय भारत स्‍वयंसेवक अथवा इतर स्‍वयंसेवकाच्‍या मदतीने निक्षय

  मित्रांची नोंदणी वाढवण्‍यात येईल, जेणेकरुन क्षयरोग मुक्‍त भारताचे ध्‍येय साध्‍य करणे शक्‍य होईल.

  • तपासणी शिबीरामध्‍ये (Screening camp) मध्‍ये आवश्‍यक असणा-या रुग्‍णांना विशेषज्ञा कडून तपासणी

   साठी संदर्भित केले जाईल व त्‍यांच्‍या आवश्‍यक त्‍या रक्‍त लघवीच्‍या तपासण्‍या, सोनोग्राफी, क्षकिरण तपासणी

   व शस्‍त्रक्रिया मोफत व नियोजन करुन करण्‍यात आले आहे.

विविध उपक्रम

  • प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये

       आरोग्य शिबिरे.

  • असंसर्गजन्य रोग तपासणी शिबिरे (मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग).
  • मोफत चष्मा वाटपासह नेत्र तपासणी शिबिरे.
  • दंत तपासणी शिबिरे.
  • माता आणि बाल आरोग्य शिबिरे (प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण).
  • महिला आणि बालकांसाठी पोषण जागरूकता सत्रे.
  • ठिकाणी आयुष आणि योग शिबिरे.
  • क्षयरोग जागरूकता आणि तपासणी शिबिरे.
  • रक्तदान शिबिरे.
  • अवयवदान प्रतिज्ञा शिबिरे.
  • मोफत औषध वितरण शिबिरे.
  • निदान शिबिरे (पॅथॉलॉजी, एक्स-रे, ईसीजी).
  • कर्करोग जागरूकता आणि तपासणी शिबिरे.
  • मानसिक आरोग्य समुपदेशन शिबिरे.
  • व्यसनमुक्ती जागरूकता सत्रे.
  • किशोरवयीन आरोग्य सत्रे.
  • शालेय आरोग्य तपासणी शिबिरे.
  • स्वच्छता आणि स्वच्छता जागरूकता शिबिरे.
  • ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर आरोग्य मेळावे / प्रदर्शने.
  • दुर्गम भागांसाठी टेलिमेडिसिन सल्लामसलत.

सहभागी संस्था व केंद्रे :

  • २७९ उपकेंद्रे
  • ५३  प्राथमिक आरोग्य केंद्रे
  • ३९  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे
  • ०२  शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रे
  • ३३  शहरी उपकेंद्रे
  • १० ग्रामीण रुग्‍णालये, ०३  उपजिल्‍हा रुग्‍णालये, ०१ जिल्‍हा रुग्‍णालये.
  • राज्यातील सर्व आरोग्य केंद्रे, संस्था, वैद्यकीय महाविद्यालये व खासगी महात्मा फुले जन आरोग्य योजना संलग्न रुग्णालये सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांचा अभियानात सक्रिय सहभाग लाभणार आहे.

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील सर्व मुली व महिला यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कमलाकर मुदखेडकर, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments