श्री गणेश गिरी गटशिक्षणाधिकारी म्हणून परळी येथे रुजू झाल्याने सत्कार संपन्न
परळी 16 गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती परळी या पदावर श्री गणेश गिरी साहेब हे रुजू झाल्याने व त्यांना परळी तालुक्यातील या पूर्वी प्रदीर्घ अनुभव असल्याने व शिक्षक वर्गातही त्यांच्या विषयी चांगला अनुभव असल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
या बद्दल त्यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक नेते शाम आघाव सर, शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद कराड साहेब,संगणक विभाग प्रमुख बाळासाहेब बोंदर साहेब ,आदर्श शिक्षक अशोक नावंदे,दगडवाडी शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम केंद्रे सर,हरिश्चंद्र चाटे सर,संतोष सावजी,प्रदीप चाटे सर,प्रकाश चाटे सर,परमेश्वर दहिफळे सर,रत्नाकर फड सर,केंद्रप्रमुख नवनाथ राख सर,चांगिरे सर,पडगी सर,जातकर सर,रेवलकर सर उपस्थित होते.