कलमशेत ची आयेशा वीणा जानू नाक्ते इंदौर येथील मॉडेलिंग शो स्पर्धेत ठरली ‘मिस टीन स्टार फेस ऑफ इंडिया’ ची मानकरी..
बोरघर/माणगाव/ रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील कळमशेत येथील रहिवाशी जानू भागूराम नाक्ते व वीणा जानू नाक्ते यांची मुलगी कु आयेशा जानू नाक्ते हिने इंदौर येथे झालेल्या मॉडेलिंग शो स्पर्धे मध्ये अर्थात आयकॉन प्रेझेंट स्टारफेस फेस ऑफ इंडिया या स्पर्धेत कुमारी आयेशा वीणा जानू नाक्ते हिने मिस टीन स्टार फेस ऑफ इंडिया २०२५ हा किताब हाशील करून (Miss Teen Starface of India 2025 ) विजेतेपद मिळवले आहे.
सदर मॉडेलिंग शो प्रखर शर्मा आयोजित असून सदर मॉडेलिंग शो चे मार्गदर्शक जगदीश प्रोहित आहेत. सदर एजन्सीचे नाव मॉडेलिंग आयकॉन शो असे आहे.
कुमारी आयेशा वीणा जानू नाक्ते ही विद्यार्थीनी बारावी ला उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन ती तेरावी चे शिक्षण घेत असून ती सध्या विरार येथे राहते. कुमारी आयेशा वीणा जानू नाक्ते हिने याआधीही विविध स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र उत्कल क्वीन स्पर्धेत रनर-अप , फेस ऑफ महाराष्ट्र ( Face of Maharashtra ) स्पर्धेत विजेतेपद , डिव्हाइन आयकॉन मिस इंडिया सुपर मॉडेल बेस्ट ॲप्टिट्यूड फिमेल
•Divine Icon Miss India Super Model मध्ये Best Attitude Female हा किताब पटकावला आहे.
कुमारी आयेशा वीणा जानू नाक्ते हिने मिळवलेल्या यशाबद्दल कुमारी आयेशा आणि तिच्या आई वडिलांचे पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड आणि सह परिवार बोरघर तालुका माणगाव यांच्या कडून खूप खूप अभिनंदन आणि तिच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
कुमारी आयेशा नाक्ते च्या यशामुळे तिच्या कलमशेत गावासह संपूर्ण तळा तालुक्यात आणि तिच्या कुटुंबियात,मित्र परिवारात आणि नातेवाईकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमारी आयेशा आणि तिच्या माता पिता यांच्या वर सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.