मुक्त विद्यापीठाचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना
१ ऑक्टोबर पर्यंत परीक्षा अर्ज भरण्याचे आवाहन
नाशिक/प्रतिनिधी/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या (कृषी पदविका शिक्षणक्रम वगळता) पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा संभाव्यपणे येत्या दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून आयोजित करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. त्यामुळे सर्व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण विषयाचे परीक्षा अर्ज विद्यापीठाच्या संकेत स्थळास भेट देवून विनाविलंब शुल्कासह येत्या दिनांक १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५- २६ च्या विविध शिक्षणक्रमात प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांची सत्र व मागील परीक्षेतील अनुत्तीर्ण विषयाची पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची हिवाळी परीक्षा येत्या २३ डिसेंबर २०२५ पासून आयोजित करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. सदर परीक्षेकरिता ऑनलाईन परीक्षा अर्ज विनाविलंब शुल्कासह सादर करण्याची मुदत ही दिनांक १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ अशी आहे. विलंब शुल्कासह येत्या दिनांक २ ते ७ ऑक्टोबर पर्यंत तर विशेष विलंब शुल्कासह दिनांक ८ ते १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हा ऑनलाईन परीक्षा अर्ज भरता येईल. मात्र यानंतर कुठल्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही. ऑनलाईन परीक्षा अर्ज हा https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamv2_ExamformSubmission_PpAmAtWise.aspx या लिंक वर उपलब्ध आहे. परीक्षा शुल्क हे केवळ ऑनलाईन भरता येईल. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी, वेळापत्रकासाठी, वेळापत्रकातील होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1494 यास वेळोवेळी भेट द्यावी. यासंदर्भात काही अडचण आल्यास परीक्षा विभागाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राशी ०२५३ – २२३०७३४ किंवा ९२०९५७६३३७ या क्रमांकावर सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी केले आहे.
