हिंदी दिवसानिमित्त दुर्गामाता विद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित
भोकरदन/ भोकरदन तालुक्यातील दुर्गामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोयगांव देवी येथे *हिंदी दिवस* निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, माय भारत जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
माय भारत, जालना यांच्या व दुर्गामाता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य देविदास पा. बोर्डे होते, तर प्रमुख पाहुणे प्रताप जंजाळ व गणेश टेकाळे उपस्थित होते. प्रस्ताविक नितिन राठोड यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन इंगळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन गणेश सुरासे यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान प्राचार्य देविदास बोर्डे यांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून सखोल माहिती दिली. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणार्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र वितरण केले गेले. तसेच, हिंदी विभागाचे नितिन राठोड आणि यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हिंदी दिवस दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटनेच्या समितीने हिंदी भाषेला भारतीय संघराज्याची राजभाषा म्हणून मान्यता दिली होती. कार्यक्रमात कर्मचारी गणेश थोरात, दिनकर सुरडकर, अनिल कोरडे, कैलास दळवी, संदीप जाधव, संदीप तेलंग्रे, श्रीमती सुजाता तायडे, श्रीमती उज्वला सपकाळ, संतोष सहाणे, दीपक दांडगे, करण दांडगे, योगेश गिरी, गणेश सुरडकर तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते व स्पर्धेत सहभागी झाले.
