Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादबिलाच्या थकबाकीसाठी खंडि‍त केलेला  वीजपुरवठा परस्पर जोडणे पडले महागात;  जालन्यात...

बिलाच्या थकबाकीसाठी खंडि‍त केलेला  वीजपुरवठा परस्पर जोडणे पडले महागात;  जालन्यात 30 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

बिलाच्या थकबाकीसाठी खंडि‍त केलेला 

वीजपुरवठा परस्पर जोडणे पडले महागात; 

जालन्यात 30 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

जालना : वीजबिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केलेला असतानाही तो परस्पर जोडून घेणे 30 ग्राहकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या सर्वांवर वीजचोरी तसेच महावितरणच्या यंत्रणेशी छेडछाड केल्याप्रकरणी थेट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी अशा प्रकरणांत जिल्ह्यात 16 गुन्हे दाखल झालेले आहेत.

भोकरदन ग्रामीण शाखेचे कनिष्ठ अभियंता प्रदीप सातदिवे यांनी सहकाऱ्यांसह तडेगावात तपासणी मोहीम राबवली. गावातील गुलाब सुखदेव जाधव, कमलबाई रामभाऊ नाईक, शेख सत्तार शेख अजीज, शेख गफ्फार शेख आजीस, बाबुराव धर्माजी साळवे व हरिबा एकनाथ पन्हाळे या ग्राहकांनी 46 हजार 254 रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला होता. त्यानंतरही त्यांनी अज्ञात इसमाच्या साह्याने लघुदाब वाहिनीला छेडछाड केली आणि आकडे टाकून विजेचा अनधिकृतपणे वापर केला. या ग्राहकांनी महावितरणचे 60 हजार 510 रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यांना जोडभारानुसार 12 हजार रुपये तडजोड शुल्कही आकारण्यात आले.

राजूर शाखेचे सहायक अभियंता आदित्य खंडीझोड यांनी सहकाऱ्यांसह तपोवन गावात तपासणी मोहीम राबवली. गावातील रमेश रंगनाथ बोर्डे, संगीताबाई सोनाजी पवार, लिंबाजी माधवराव बोर्डे, विमलबाई सुखदेव पवार, दयानंद रघु पवार, अंबादास धोंडीबा पवार व सुदाम दगदुबा पवार या ग्राहकांनी 60 हजार 546 रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला होता. त्यानंतरही त्यांनी अज्ञात इसमाच्या साह्याने लघुदाब वाहिनीला छेडछाड केली आणि आकडे टाकून विजेचा अनधिकृतपणे वापर केला. या ग्राहकांनी महावितरणचे 70 हजार 590 रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यांना जोडभारानुसार 14 हजार रुपये तडजोड शुल्कही आकारण्यात आले.

भोकरदन शहर शाखेचे सहायक अभियंता प्रमोद दारकोंडे यांनी सहकाऱ्यांसह दावतपूर गावात तपासणी मोहीम राबवली. गावातील नंदाबाई दादाराव घायवट, प्रभाकर किसन घायवट, विश्वास त्रिंबक घायवट, अण्णा वामनराव देशपांडे, रमेश नामदेव घायवट, शंकर कृष्णा घायवट, अशोक फकीर घायवट व रुबिंद्र नारायण घायवट या ग्राहकांनी 1 लाख 80 हजार 866 रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला होता त्यानंतरही त्यांनी अज्ञात इसमाच्या साह्याने लघुदाब वाहिनीला छेडछाड केली आणि आकडे टाकून विजेचा अनधिकृतपणे वापर केला. या ग्राहकांनी महावितरणचे 59 हजार 650 रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यांना जोडभारानुसार 16 हजार रुपये तडजोड शुल्कही आकारण्यात आले.

हसनाबाद शाखेचे कनिष्ठ अभियंता‍ मयूर बुलगे यांनी सहकाऱ्यांसह जानेफळ मिसाळ गावात तपासणी मोहीम राबवली. गावातील भागुबाई जगनाथ मिसाळ, गंभीरराव संतुकराव मिसाळ, कृष्णा बालाजी कांबळे, लताबाई माणिकराव बनसोडे व सुखदेव यादवराव मिसाळ या ग्राहकांनी 61 हजार 655 रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला होता. त्यानंतरही त्यांनी अज्ञात इसमाच्या साह्याने लघुदाब वाहिनीला छेडछाड केली आणि आकडे टाकून विजेचा अनधिकृतपणे वापर केला. या ग्राहकांनी महावितरणचे 50 हजार 660 रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यांना जोडभारानुसार 10 हजार रुपये तडजोड शुल्कही आकारण्यात आले.

बदनापूर शहर शाखेचे सहायक अभियंता कृष्णा कुलकर्णी यांनी सहकाऱ्यांसह बदनापूरमध्ये तपासणी मोहीम राबवली. गावातील शेख बाबा शेख अकबर, हसनुरबी शेख महेमूद, सायराबी सय्यद बाशीर व शेख तय्यब शेख अहमेदराज या ग्राहकांनी 27 हजार 857 रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला होता. त्यानंतरही त्यांनी अज्ञात इसमाच्या साह्याने लघुदाब वाहिनीला छेडछाड केली आणि आकडे टाकून विजेचा अनधिकृतपणे वापर केला. या ग्राहकांनी महावितरणचे 30 हजार 285 रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यांना जोडभारानुसार 8 हजार रुपये तडजोड शुल्कही आकारण्यात आले.

या 30 ग्राहकांकडे वीजबिलांची 3 लाख 77 हजार रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केलेला होता. त्यानंतरही त्यांन विद्युत यंत्रणेशी छेडछाड केली आणि परस्पर वीज जोडून अनधिकृतपणे वापर केला. त्यांना वीजचोरीची 2 लाख 71 हजार 695 रुपयांची निर्धारित बिले देण्यात आली. तसेच 60 हजार रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले. या सर्व आरोपींवर भोकरदन पोलिस ठाणे व जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यात विद्युत कायद्याच्या कलम 135 व 138 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अशा प्रकरणांत 16 ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत जालना जिल्ह्यात परस्पर वीज जोडून वीजचोरी करणाऱ्या 46 ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments