भाजपा जालना महानगर जिल्ह्यात
“सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे
जालना/प्रतिनिधी/ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती हा सेवा पंधरवाडा दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने दिलेले सर्व कार्यक्रम महानगर जिल्ह्यात राबवून सेवा पंधरवाडा यशस्वी करा असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सेवा पंधरवाडा कार्यशाळा कार्यक्रमात बोलताना कार्यकर्त्यांना केले.
यावेळी व्यासपीठावर जालना विधानसभेचे माजी आमदार मा.कैलासजि गोरंटयाल, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, विजय कामड, सौ.विमलताई आगलावे, महानगर माजी जिल्हाध्यक्ष अशोक पांगारकर, सतीश जाधव, महानगर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शुभांगीताई देशपांडे, युवा नेते अक्षय गोरंटयाल, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, संजय डोंगरे, महेश निकम, अमोल धानुरे, वसंत शिंदे, धनराज काबलीये, अर्जुन गेही, माजी सरचिटणीस देविदास देशमुख इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्हा व बूथ स्तरावर रक्तदान शिबीर, दि.१७ ते २४ सप्टेंबर आरोग्य शिबीर, दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी, १८ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत रक्तदान शिबीर दुरसा टप्पा मंडळ स्तरावर घेणे, १९ व २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांच्या जीवनावर आधारित पुस्तक व प्रदर्शन तसेच पुस्तकाचे वितरण जिल्हा स्तरावर करायचे आहे. २२ ते २३ सप्टेंबर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, २५ सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेष पुष्पांजली तसेच एक पेड मा के नाम कार्यकर्त्यांच्या घरी स्नेह भोजन हा कार्यक्रम बूथ स्तरावर घेणे, तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन व कार्य विकसित भारत आत्मनिर्भर भारत हा कार्यक्रम जिल्हा स्तरावर घेणे, त्यानंतर ओकल फॉर लोकल प्रचार प्रसार स्थानिक मेळाव्यांचे आयोजन म.न.पा. तसेच प.स. यांच्या माध्यमातून घेणे, २७ ते २८ सप्टेंबर जिल्हा स्तरावर मेरोथोन स्पर्धा, २ ऑक्टोबर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पांजली व खादी वस्तू खरेदी करणे हा स्वदेशीचा नारा देणे, २९ ऑगस्ट ते २५ डिसेंबर या वेळेत महानगर स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे. इत्यादी कार्यक्रम घेऊन हा सेवा पंधरवडा कार्यकर्त्यांनी यशस्वी करावा असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
