Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादलालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ’आविष्कर’चे उद्या उद्घाटन

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ’आविष्कर’चे उद्या उद्घाटन

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ’आविष्कर’चे उद्या उद्घाटन

जालना/  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हयास्तरीय आविष्कार महोत्सवलाल बहादूर शास्त्री यात येत्या शनिवारी (दि.११) आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या संशोधन व जिज्ञासूवृत्तींना प्रोत्साहन देण्यासाठी राजभवनच्या वतीने राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यापूर्वी ही विद्यापीठ स्तरीय स्पर्धा होत आहे.  आविष्कार स्पर्धांच्या तयारीसाठी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली संयोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत चारही जिल्ह्यातील महाविद्यालय निवडण्यात आली. तसेच १० ते २४ सप्टेंबर या दरम्यान जिल्हा स्तरीय आविष्कार स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.  यानूसार जालना जिल्हा- लालबहादूर शास्त्री  महाविद्यालय, परतूर १३ सप्टेंबर येथे घेण्यात येईल. या  महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांच्यासह आविष्कार समन्वयक डॉ.शैलेंद्र शेलार उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सहा शाखेतील विजेते स्पर्धक केंद्रीय आविष्कारमध्ये सहभागी होतील. तर प्रत्येक जिल्ह्यातून निवडण्यात आलेले टॉप थ्री संघ हे केंद्रीय आविष्कार स्पर्धेत सहभागी होतील. ३ व ४ ऑक्टोबर  रोजी विद्यापीठ परिसर, छत्रपती संभाजी नगर येथे  ही  स्पर्धा होणार आहे. जिल्हास्तरावर केवळ पदवीच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार होईल यामधील विजेते आणि पदव्युत्तर पदवी व पदवी तर पदव्युत्तरनंतरची पदवी या स्तरातील स्पर्धा थेट केंद्रीय स्तरावर होणार आहेत. ही स्पर्धा सहा गटात होईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments