Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबाद भोकरदन शहरासह तालुक्यात सरकारी जमिनी बाळकवणारी टोळी सक्रिय!

 भोकरदन शहरासह तालुक्यात सरकारी जमिनी बाळकवणारी टोळी सक्रिय!

 भोकरदन शहरासह तालुक्यात सरकारी जमिनी बाळकवणारी टोळी सक्रिय!
 भोकरदन मतदारसंघांमध्ये सरकारी जमिनी  बळकावणारांची एक टोळी सक्रिय झाली असून त्यामध्ये राजकीय पुढारी, अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. सर्वांच्या संगनमताने भूमाफिया राज भोकरदन शहर व भोकरदन मतदारसंघांमध्ये  अनुभवाला येत आहे.त्याबाबत आम आदमी पार्टीने भीम आर्मी स्वराज पार्टि व मतदार संघातील लहान मोठ्या संघटनांमार्फत आज मुख्यमंत्र्यांना तक्रार पाठवली असून त्या मुद्द्यावर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शासन आणि प्रशासनाला दिलेला आहे. असे बोरसे गुरुजींनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात कळविले आहे
निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की,भोकरदन जाफराबाद शहर तसेच संपूर्ण भोकरदन मतदारसंघांमध्ये सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच भु माफियांच्या  संगनमताने जमिनी हडप करण्याचे प्रकार हाणून  पाडण्यात यावेत. संबंधितावर योग्य कारवाई करण्यात यावी
  भोकरदन मतदार संघातील तसेच भोकरदन व जाफराबाद शहरातील सरकारच्या मालकीच्या जमिनी तसेच अनेक सरकारी इमारती पाडून या सरकारी इमारतीच्या जागा तसेच  शाळेच्या जागा,शाळेची खेळाची मैदाने,सार्वजनिक मैदाने, नगरपरिषद हद्दीतील ओपन स्पेस, बळकावून त्या ठिकाणी खाजगी इमारतींची बांधकामे चालू केलेली आहेत. ही अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवण्यात यावीत. मोडकळीस आलेले सरकारी कार्यालये सरकारी  अधिकाऱ्यांच्या निवासाच्या खोल्या पाडून त्या ठिकाणी खाजगी बांधकामे होत आहेत. ती तात्काळ थांबवण्यात यावीत. तसेच जी सरकारी कामे चालू आहेत त्या ठिकाणी काम कोणत्या विभागामार्फत व कशाचे चालू आहे हे दर्शनी फलक लावले जात नाहीत. त्यामुळे ते बांधकाम खाजगी आहे किंवा सरकारी आहे याचा बोध नागरिकांना होत नाही. असे मुद्दाम संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जात आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी  आणि अधिकारी स्थानिक राजकीय पुढारी आणि  भू माफिया व भूमाफिया  गॅंग यांचा समावेश आहे. या जमिनी कोट्यावधी रुपयाच्या असून संबंधित क्षेत्रीय अधिकारी यामध्ये सामील आहेत. मग ते त्या कार्यालयाचे प्रमुख असोत शाळेचे प्रमुख असोत किंवा त्या ठिकाणचे तलाठी ग्रामसेवक  मंडळ अधिकारी तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी सुद्धा यामध्ये सामील आहेत. त्यामुळे संबंधित सर्व प्रकरणाची  जिल्हा बाहेरील अधिकाऱ्यांच्या समितीमार्फ तरीतसर चौकशी करून सरकारी जमिनी बाळकावण्याचा हा डाव हाणून पाडण्यात यावा आणि संबंधित लोकांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टी,  भीम आर्मी, स्वराज्य पार्टी व स्थानिक सर्व संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहीलयाची नोंद घेण्यात यावी. असा इशारा देण्यात आलेला आहे.
 निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन,माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन,मंत्रालय भवन मुंबई,माननीय जिल्हाधिकारी जालना जिल्हा,माननीय विभागीय आयुक्त  छत्रपती संभाजीनगर विभाग संभाजीनगर  यांना माननीय विभागीय अधिकारी भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना. यांच्यामार्फत पाठवण्यात आलेले आहेत तसेच माहितीसाठी माननीय खासदार कल्याण रावजी काळे साहेब, विरोधी पक्षनेता श्री अंबादासजी दानवे साहेब. यांना देण्यात आलेले आहेत.
योग्य कार्यवाहीसाठी माननीय तहसीलदार तहसील कार्यालय भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना. यांना देण्यात आलेली आहे. यावेळी  बोरसे गुरुजी महेजाद खान अनिल पगारे व मुद्दसरभाई रफाफिक शेखयांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments