प्रगती विद्यालयात शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
बीड:- प्रगती विद्यालय बालेपीर बीड येथे आज दिनांक 8 9 2025 रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येते म्हणून बीड जिल्ह्यात अल्पावधीत नामवंत ठरलेली प्रगती विद्यालय बालेपीर बीड या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन व स्वयंशासन दिन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे इ १०वी च्या विद्यार्थ्यांनी आज संपूर्ण दिवस अध्यापनाचे कार्य केले आहे शिक्षकांची भूमिका व प्रशासनिक जवाबदारी स्विकारून शाळेचे अध्यापनाचे कामकाज पार पाडले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या कार्याचा अनुभव घेतला आहे विविध विषयांचे अध्यापन विद्यार्थ्यांनी उत्साहात केले शिक्षण क्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांचा आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो व्यक्ती आणि समाजाच्या विकास शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे जिथे शिक्षण आहे तेथेच विकास आहे म्हणून शिक्षणातून व्यक्तीचे जडण-घडण करणाऱ्या शिक्षकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो म्हणून आजच्या दिवसाची मुख्याध्यापक नागरगोजे व उपमुख्याध्यापक घोळवे अभिजीत व इतर शिक्षकांनी सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले आहे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे