वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करा,शेतकरी संघटनेची वन विभागाकडे मागणी
कन्नड/ तालूका भरातील शेत शिवरात मुक्त वन्य प्राणी मुक्त संचार करून शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उगविलेल्या कवळ्या मालाची नासाडी करीत आहे.तसेच शेतशिवारातील रहाणाऱ्या मानव जातीवर हिंस्र वन्य प्राणी हल्ला करीत आहे.आशा प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा,आशा आशयाचे एक निवेदन वन्य विभागास शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे नमुद करण्यात आले आहे की,तालूका हा दऱ्या खोऱ्यांनी व्यापलेला असलेमुळे या ठिकाणी हिंस्र वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे.त्याच बरोबर रांडूकरे,निल गाय सह हरणांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उगवलेल्या कवळ्या मालाचे सदर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.तालुक्यातील केसापूर,वैसपूर,लव्हाळी टाकळी,जळगाव घाट.