सभापती जयदत्त नरवडे यांना पितृशोक
माजलगाव/प्रतिनिधी/ तालुक्यातील सुलतानपुर (माळेवाडी) येथील प्रगतशिल शेतकरी म्हणुन ओळख असलेले सुभाषराव नरवडे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
सुभाषराव नरवडे हे प्रगतशील शेतकरी तसेच मनमिळावु स्वभावाचे मितभाषी व्यक्तीमत्व असल्याने पंचक्रोषित परिचीत होते. त्यांच्या पार्थीव देहावर सुलतानपुर (माळेवाडी) येथे सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. माजलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त अण्णा नरवडे यांचे ते वडील होते.