बाल विकास प्राथमिक शाळेच्या
अध्यक्षपदी विद्याताई कुलकर्णी
जालना/प्रतिनिधी/ जुना जालना महिला मंडळ संचलित कसबा येथील श्रीमती प्रभावतीबाई कोळेश्वर बालविकास प्राथमिक शाळेच्या अध्यक्षपदी सौ. विद्याताई सुरेशराव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
5 सप्टेंबर या शिक्षक दिनी आयोजित संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी सौ. विद्याताई कुलकर्णी, उपाध्यक्षपदी सौ. विजया बागुल, सचिवपदी सौ. सुनंदा बदनापूरकर, कोषाध्यक्षपदी सौ. मीरा देशपांडे, सहसचिवपदी सुषमाताई पायगव्हाणे, कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सौ. सुखदा देशपांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संचालिका सौ. शुभांगी देशपांडे, सौ विजू देशपांडे, सौ सीमाताई देशपांडे आदींची उपस्थिती होती. या निवडीबद्दल सौ. विद्याताई यांचे समाजाच्या सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी बोलताना सौ. विद्याताई म्हणाल्या की, यापूर्वीही मला अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली होती. त्या काळात सातवीपर्यंत वर्ग विस्तार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. आता दुसऱ्यांदा मिळालेली संधी माझ्यासाठी अहोभाग्य असून, विद्यार्थी संख्या वाढविणे आणि टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंत वर्ग वाढवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील, असे असे त्या म्हणाल्या.