Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादशेख आझम शेख मेहमूद यांची राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेल छत्रपती...

शेख आझम शेख मेहमूद यांची राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

शेख आझम शेख मेहमूद यांची राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/  दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात प्रदेश अध्यक्षा मा. सौ. मेघा पवार ताई यांच्या हस्ते शेख आझम शेख मेहमूद यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. शेख रफीक भाई (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मध्य विधानसभा शहर अध्यक्ष), मा. युसुफ खान (जिल्हा अध्यक्ष), मा. सय्यद मोसिन (महाराष्ट्र प्रदेश सचिव), मा. शेख अन्नवर (शहर सचिव) आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व संघटना बळकट करण्यासाठी आपण कार्यरत राहाल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षा मेघा पवार यांनी व्यक्त केला.
शेख आझम यांच्या नियुक्तीबद्दल सर्व मान्यवर व पदाधिकारी यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments