रामदास फुसे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा सन २०२४ / २५ चा आदर्श शिक्षक पुरस्कार सोयगाव तालुक्यातील जंगलातांडा येथील जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक रामदास फुसे यांना जाहीर झाला असून लवकरच जिल्हा परिषदेतर्फे हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रामदास फुसे यांचे शिक्षक मित्र परिवार सोयगावतर्फे अभिनंदन करण्यात आले यावेळी प्रताप साळुंखे, रामदास चंडोल, पारसिग चव्हाण,किरण पाटील माधव पंडित,प्रल्हाद चौधरी यांच्यासह तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.