निंबायती माध्यमिक विद्यालयात करीयर व इतर शैक्षणिक विषयी मार्गदर्शन
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील कै.वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयत विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पाचोरा व डाँ.प्रतिभा ताई नंदू ढाकरे (निंबायती) यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षणाचे आयडीयल स्टडी अँप हे बुधवारी (ता.३)ज्ञमोफत देण्यात आले.
तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष डाँ.मुकेश आर तेली यांनी करीयर व इतर शैक्षणिक विषया संबधित विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन ही केले, संजय कोतकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सावित्री च्या लेकी कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन केले या प्रसंगी माजी उपसरपंच शेखर नारायण ढाकरे ऊपस्थित आदी होते. सर्व रोटरी क्लब टिमचे विद्यालया तर्फे येथेच्छ सत्कार सुध्दा करण्यात आला होता.