जालना गणेश फेस्टिवलमध्ये गाजला तो तुमच्यासांठी काय पण… हा कार्यक्रम!
जालना : बालाजी प्रस्तुत तुमच्यासाठी काय पण… हा कार्यक्रम चांगलाच गाजला! कारण लावणीसह हिंदी मराठी गाण्यांची मैफील चांगलीच जमली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाने आतापर्यंत विदेशातही आपल्या कलेचा ठसा उमविणार्या नृत्यांगणा या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. त्यामुळेच या कार्यक्रमाने जालनेकरांचे लक्ष घेतले.
या कार्यक्रमाच्या सुरुतीस डॉ. बळीराम बागल आणि ज्येष्ठ विधीज्ञ वाल्मीकराव घुगे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी फेस्टीवलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अध्यक्ष अशोकराव आगलावे, माजी अध्यक्ष राजेंद्र गोरे, फेस्टीवलचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब घुगे, कोषाध्यक्ष रवींद्र हुसे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी गण नायकाला वंदन केेल्यानंतर या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पुनम कुडाळकर यांची बहारदार लावणी झाली. तत्पूर्वी गण, गौवळ झाली. यासही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास संयोजन समितीचे दिनेश फलके, किरण गरड, राजेंद्र राख, सुभाषराव कोळकर, शरद देशमुख, अशोकराव उबाळे, चंद्रशेखर वाळिंबे, ज्ञानेश्वर कदम, सुरेशराव मुळे, प्रा. राजेंद्र भोसले, अजिंक्य घोगरे, सुरेशराव मुळे, प्रसाद वाढेकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमासाठी दै. राजसम्राटचे संपादक अविनाश कव्हळे, प्रा. रावसाहेब ढवळे, पंडीतराव तडेगावकर, अवनिश गरड, धन्नू काबलिये, हरिहर शिंदे, विमलताई आगलावे, अविनाश भंडे, रोहित देशमुख, उदय देशमुख, संजय देशमुख, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन अजिंक्य घोगरे यांनी केले. स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियमवर दररोज सायंकाळी 7 वाजता होणार्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.
आज आबाकी आयेगी बारात हा कार्यक्रम
उद्या गुरुवारी म्हणजे 4 सप्टेंबर 2025 रोजी प्रभाकर मोरे यांचा आबाकी आयेगी बारात हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
