जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर
कालावधीत सेवा पंधरवाडाचे आयोजन
जालना :- जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्र्र्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीतमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पहिला टप्पा पाणंद रस्ते विषयक मोहीम, दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पुरक उपक्रम आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक परिस्थितीचा विचार करुन नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. असे प्र.निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
