दीनदयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती
योजना स्पर्धा परीक्षेसाठी मुदतवाढ
जालना :- परभणी डाक विभागाकडून दीनदयाळ उपाध्याय स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना स्पर्धा परीक्षा 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी दि.10 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी परभणी डाक विभागातंर्गत येणाऱ्या परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अधिक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
