Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजालना MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई : वाहनचालकाकडून ४ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस...

जालना MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई : वाहनचालकाकडून ४ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार रंगेहात अटक*

जालना MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई : वाहनचालकाकडून ४ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार रंगेहात अटक

जालना/प्रतिनिधी/ जालना MIDC पोलिस ठाणे हद्दीत कार्यरत असलेले हवालदार हेऱड अब्दुल गफार शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद पथकाने रंगेहात पकडले. वाहन चालकाकडून ४,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
घडलेली घटना:
दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.३० वा. च्या सुमारास MIDC पोलिस ठाणे, छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीत ही कारवाई झाली. तक्रारदार वाहनचालक यांच्याकडून नियमभंगाच्या गुन्ह्यात अडवलेल्या त्यांच्या वाहनाच्या सुटकेसाठी हवालदार हेऱड अब्दुल गफार शेख यांनी २०,०००/- रुपयांची लाच मागितली होती. वाटाघाटीनंतर ४,०००/- रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याची माहिती तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
त्यावरून पथकाने सापळा रचून हवालदार शेख यांना ४,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाईचे नेतृत्व:
या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबादचे पोलिस उपअधीक्षक बालु साळधर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलिस निरीक्षक श्रीमती माधुरी काकडे, पोलिस हवालदार हेमंत पाटील, पोलिस अंमलदार राजेंद्र शिंदे, गजानन गायकवाड, मनोहर भुंकटे, त्र्यंबक गवळी, अशोक राठोड आदींचा समावेश होता.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments