ग्रामपंचायत सदस्य नारायन वाकळे आणि प्रतिष्ठित व्यापारी मुकेश भाठीया यांच्याकडून १२ हजार बिस्कीट पुडे
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथून थेट मुंबई ला आझाद मैदानात चालू असलेल्या संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी असलेल्या समाजबांधवांसाठी आहाराची व्यवस्था व्हावी म्हणुन लासुर स्टेशन व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या व समाज बांधवांतर्फे आज सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे कर्तव्याची शिदोरी म्हणून बाजरीच्या भाकरी मिरचीचा ठेचा बिसलेरी पाण्याची बॉटल बिस्कीट सुकामेवा फरसाण इत्यादी समाज बांधवांनी पोहोच करावे त्यानंतर आठ वाजेनंतर समाज बांधव सदर शिदोरी घेऊन मुंबई येथील आझाद मैदान येथे घेऊन जाणार आहे.दरम्यान अन्नदानाचा ओघ समाज बांधवांसह इतर समाजातील नागरिकांकडूनही चालू झाला असून लासुर स्टेशन ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे व प्रतिष्ठित व्यापारी मुकेश भाठीया यांनी १२०००, बिस्कीटचे पुडे दिली असून मोठ्या प्रमाणवर चालू झाला असून जास्तीत जास्त नागरिकांनी शक्यतो चार-पाच दिवस टिकेल असे खाद्यपदार्थ आणून द्यावेत असे आवाहन सकल मराठा समाज बांधवां तर्फे करण्यात आले आहे.