गावाकडे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून अन्न मुंबईला रवाना
(ज्याच्याकडून जे होईल ते करा या जरांगे पाटलांच्या आवाहानाला साद देत भाकर भाजी रवाना
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्याच्याकडून जे जे योग्य व शांततेच्या मार्गाने होईल ते ते करा व आरक्षण मिळेपर्यंत शांत बसू नका अशी घोषणाच जरांगे पाटलांच्या कडून होत असताना खेड्या पाड्यातून रसद पुरविली जात आहेत.
गावाकडील, गल्लीतील स्थापन केलेल्या गणेशाला नैवेद्य दाखवून गावात भंडाऱ्या ऐवजी आझाद मैदानावर अन्न स्वरूपात मदत करण्यावर भर दिसून येत आहेत.)
कन्नड ग्रामीण प्रतिनिधी.सुनिल निकम कन्नड तालुक्यातील रामनगर, हस्ता नाचनवेल पिशोर गावातून भाजी भाकरी, पुऱ्या पुड्या,ठेचा तर नादरपूर येथील गणेश मंडळाने परंपरागत गणेश मंडळाचा भंडारा रद्द करून, ते अन्न बुंदी स्वरूपात मुंबई पिशोर येथूनही गणेश मंडळ सकल मराठा समाज,दानशूरांच्या सहभागाने बुंदी आरक्षण स्थळी आझाद मैदानावर रवाना होत आहेत