महिला बचत गटांना गणपती बाप्पा पावला;-सहा हजार ४३ मूर्ती विक्रीतून मिळाले २७ लक्ष १६ हजार ७०९ रु
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ उमेद गणेशोत्सव २०२५ अंतर्गत वीस विक्री केंद्रातून महिला बचत गटांनी ६ हजार ४३ मूर्ती विक्रीतून २७ लक्ष १६ हजार ७०९ रु रक्कम वीस बचत गटांना मिळाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी दिली दरम्यान महिला बचत गटांमधील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पंचायत समितीच्या उमेद अभियानाने हा उपक्रम राबविला होता या उपक्रमात वीस महिला बचत गटांच्या हात बळकट झाले आहे
सोयगाव सह तालुक्यात वीस बचत गटांनी गणपती विक्री केंद्र उभारून सहा हजार ४३ गणेश मूर्त्यांची विक्री केली आहे सोमवार ते बुधवार तीन दिवसांत २७ लक्ष १६ हजार ७०९ रु ची विक्री केली आहे.दरम्यानउमेद गणपती महोत्सव २०२५ साठी सोयगाव शहरात सोयगाव पंचायत समिती आवारात,बाजार पट्टा, बस स्टँड,व आठवडे बाजार या चार ठिकाणी विक्री केंद्र उभारण्यात आले होते तालुक्यातील ग्रामीण भागातील आमखेडा, किन्ही,बनोटी, फरदापुर, गोंदेगाव,पळसखेडा,नांदगाव, निंभोरा, बहुलखेडा या ठिकाणी गणेश मूर्ती विक्री केंद्र उभारण्यात आले होत यासाठी-तालुका अभियान व्यवस्थापक तुषार बरगट , तालुका व्यवस्थापक प्रेमनाथ राठोड, सखुबाई पवार, मनोज राठोड, प्रभाग समन्वयक सत्य विजय राठोड, सज्जन बिलारी तसेच निलेश खोडके, ऋषिकेश देशमुख, समाधान घुगे आदींनी पुढाकार घेतला होता