एक समाज,एक गणपती या अनोख्या संकल्पनेची मुहूर्तमेढ
श्री.संत भगवान बाबा गणेश मंडळाचा उपक्रम
एक समाज एक गणपती या अनोख्या संकल्पनेची मुहूर्तमेढ छ.संभाजीनगर शहरातील
श्री संत भगवानबाबा गणेश मंडळानी रोवली आहे.
शहरातील सर्व समाज बांधव व परिवार तर्फे संस्थापक अध्यक्ष माजी निवृत्ती पोलिस अधिकारी डॉ.कांचनकुमार चाटे यांच्या मार्गदर्शनात श्री गणेशाची मूर्ती सिडको मध्ये स्थापन करण्यात आली आहे.समाजातील आप- आपसातील वेगवेगळे वाद ,अनावश्यक खर्च आणी ध्वनी प्रदूषण होऊ नये या सामाजिक कर्तृत्वाच्या भावनेतून एक समाज एक गणपती ही संकल्पना घेऊन सुरवात करण्यात आली.गणेश मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवत,कीर्तन,भजन, नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. धार्मिक उत्सवाला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमची जोड देण्यात येणार.समाजातील सर्व मार्गदर्शक व सल्लागार यांनी एक समाज एक गणपती
श्री संत भगवानबाबा गणेश मंडळाची कार्यकरणी घोषित केली.ती पुढील प्रमाणे आहे