Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादसुरव तर्फे निजामपूर ग्रामस्थांचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश  तळाशेत जिल्हा परिषद...

सुरव तर्फे निजामपूर ग्रामस्थांचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश  तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी

सुरव तर्फे निजामपूर ग्रामस्थांचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश 
तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी
बोरघर/माणगाव/ दिनांक  २९ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह माणगाव येथे माणगाव तालुक्यातील तळाशेत जिल्हा परिषद गणातील सुरव तर्फे निजामपूर येथील ग्रामस्थांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे,जेष्ठ नेते संजय आप्पा ढवळे,तालुकाध्यक्ष परेश सांगले यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.यावेळी प्राजक्ता शुक्ला मॅडम,तालुका सरचिटणीस बाबुरावजी चव्हाण,तालुका उपाध्यक्ष सुधीरजी म्हामुणकर,महादेवजी कदम,समीरजी बक्कम,युवा सरचिटणीस अमोल पवार,युवा सरचिटणीस श्रीराम कळंबे,नीलमजी काळे,किसान मोर्चा नयनजी पोटले,अनिलजी दांडेकर,समीरजी पवार,अनिकेत करकरे,अनिल सत्वे हे उपस्थित होते.
     यावेळी बाबाजी लहाने, सदाशिव लहाने, धोंडू लहाने, दिपक लहाने, नथुराम लहाने, विजय लहाने, प्रितेश लहाने, महेंद्र लहाने, मंगेश खाडे, प्रशांत लहाने, विकास भोनकर, प्रतिक लहाने, नयन लहाने, पंकज लहाने, राजश्री लहाने, अनिता लहाने, मंजुला लहाने चंदा लहाने, नम्रता लहाने, लतिका खाडे, ऋतुजा लहाने, प्रणाली लहाने, भक्ती लहाने, आकांक्षा लहाने आदी सुरव तर्फे निजामपूर ग्रामस्थांनी भाजप पक्षात पक्ष प्रवेश केला.
    यावेळी निलेश थोरे पुढे म्हणाले की, भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून एक कुटुंब आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तळाशेत जिल्हा परिषद व साई पंचायत समिती गणात भाजप पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेल. सुरव तर्फे निजामपूर गावातील विकास कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध केला जाईल, असा विश्वास यावेळी थोरे यांनी व्यक्त केला. तसेच तालुका अध्यक्ष परेश सांगळे म्हणाले की, सुरव तर्फे निजामपूर ग्रामस्थांच्या अडचणीच्या काळात भाजप पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील.  त्यांना सर्वोत्परी ताकद भाजप पक्षातर्फे दिली जाईल. सर्व प्रवेशकर्त्या ग्रामस्थांचे सांगळे यांनी भाजप पक्षात स्वागत केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments