Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादगंगापूर नगरपालिकेच्या कार्य करणालीवर प्रश्नचिन्ह भाडेतत्त्वावर दिलेले गाळेमध्ये दारू विक्री

गंगापूर नगरपालिकेच्या कार्य करणालीवर प्रश्नचिन्ह भाडेतत्त्वावर दिलेले गाळेमध्ये दारू विक्री

गंगापूर नगरपालिकेच्या कार्य करणालीवर प्रश्नचिन्ह भाडेतत्त्वावर दिलेले गाळेमध्ये दारू विक्री

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ गंगापूर नगरपालिकेच्या कार्य करणालीवर प्रश्नचिन्ह नगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर दिलेले गाळेमध्ये कोणतेही अमली पदार्थाची विक्री करण्यात येणार नाही असे करारनाम्यात नगरपालिकेकडून गाळे भाडे तत्वावर देताना संबंधित काळे मालकाकडून केले जाते. एकदा गाळ्यांची हराशी एकदा झाली की परत नगरपालिकेकडून कोणत्या काळयामध्ये काय विक्री केले जाते याकडे नगरपालिका प्रशासनाकडून कधीही बघितलं जात नाही.  नगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा आहे. मागील अनेक वर्षापासून नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये काही गाळे मध्ये दारूच्या दुकाना ठाटले आहे. यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांंना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणाकडे नगरपालिका ने कधीही ढुकून बघितले नाही तसेच आजूबाजूच्या दुकानात ग्राहकांना  ये. जा. करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तळीरामांच्या धिंगाणा या परिसरात सुरू असल्यामुळे काही वेळेस अश्लील भाषेत देखील तळीराम धिंगाणा घालत असल्याची चर्चा आहे. नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये देशी दारूच्या दुकाना टाकले आहे नगरपालिका प्रशासनाने  न हरकत परवानगी  दिलेली आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. नगरपालिकेची मालमत्ता भाडे करारनामा करायच्या वेळेस काही अटी व शर्ती करारनाम्यात दिलेले असते परंतु या आदेशातील पालन न करता काही दुकानदारांनी आपल्या मनमानी पद्धतीने दारूच्या दुकाना टाकून बसले  आहे. असे दुकानदारांवर कारवाई होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments