जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर
जालना/ राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार जालना जिल्हा परिषदेच्या 57 जागा आणि त्याअंतर्गत भोकरदन-22, जाफ्राबाद-12, बदनापूर-10, जालना-18, मंठा-12, परतूर-10, घनसावंगी-14 व अंबड-16 अशा एकूण जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.
ही अधिसूचना जालना जिल्हाधिकारी कार्यालय, जालना जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असेल. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
