श्री करिअर अकॅडमी येथे सद्भावना दिवस साजरा
जालना : आज दि. 20 ऑगस्ट रोजी श्री करिअर अकॅडमी येथे सद्भावना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मेरा युवा भारत, जालना व श्री करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकॅडमीचे संचालक संदीप जाधव, युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड व संत भगवान बाबा युवा मंडळाचे अध्यक्ष वैभव कंगणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कंगणे यांनी केले. प्रमुख पाहुणे संदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजात शांतता, ऐक्य व बंधुभाव टिकवणे ही आजच्या पिढीची मोठी जबाबदारी आहे. विविध धर्म, भाषा व संस्कृतींनी नटलेल्या भारतात एकात्मता हेच आपले बळ आहे, आणि ही भावना विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून व्यक्त केली पाहिजे.
यानंतर जयपाल राठोड यांनी आभारप्रदर्शन केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले. सद्भावना दिवस आपल्याला हिंसेपेक्षा शांतता, वैराऐवजी बंधुभाव आणि मतभेदाऐवजी एकात्मतेचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा देतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर जाधव, सोपान राठोड यांच्यासह अकादमीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.