मौलाना आज़ाद महामंडळाकडून प्रोपर्टीवर दोनवर्ष झाले बोजे टाकुन तरी कर्ज मिळेना शासनाची अल्पसंख्याक समाजासोबत दुटप्पी भुमिका
लोक सेना संघटनकडुन जाहिर निषेध
बीड प्रतिनिधि: लोक सेना संघटनने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना एका निवेदनादवारे मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाला जास्तीत जास्त बजट दयावे या विषयाकडे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केले आहे राज्य शासनाने अल्पसंख्याक समाजाला शिक्षण व व्यवसाय करण्याकरिता कर्ज योजना म्हणून मौलाना अबुल कलाम आज़ाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे परंतु बीडसह राज्यातील अनेक जिल्हयात बजट नसल्याने अनेक अल्पसंख्याक समाजाच्या युवकांना उच्च शिक्षणा पासुन वंचित रहावे लागत आहे व जे शैक्षणिक बेरोजगार आहे ज्यांनी छोटे मोटे व्यवसायासाठी प्रस्ताव दाखल केले त्या युवकांच्या प्रोपर्टीवर दोन दोन वर्ष झाले मौलाना आज़ाद कार्यालयाकडून बोजे टाकून तरी मंजुर झालेल्या कर्जदारांना आज तारखेपर्यंत कर्जाचे धनावेश वाटप करण्यात आलेले नाही बेरोजगार युवक कर्ज रक्कमची चौकशी करण्यासाठी गेले का कार्यालयाचे एकच उत्तर “घ्या बाबुरावचा ठुल्लु” शासनाकडे बजट नाही असे उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहे, शासनाने तात्काळ मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाला जास्तीत जास्त बजेट देवून अल्पसंख्याक समाजाला न्याय दयावे नसता लोक सेना संघटनला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा लोक सेना संघटन प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिला आहे.