संस्कृत भाषा ही अतिशय समृध्द भाषा आहे
संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेमध्ये प्रचंड शब्द संग्रह असून संस्कृत भाषेमधील सुभाषितांमुळे संस्कृत भाषा ही अतिशय समृध्द भाषा झाली असून विचाराने समृध्द बनवणारी भाषा आहे असे प्रतिपादन श्रीराम संस्कृत विद्यालय (पाठशाळा),ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय,व अखिल भारतीय शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठान,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत दिनानिमित्ताने दिनांक -१९/०८/२०२५ रोजी आयोजित संस्कृत दिन व शालेय संस्कृत स्पर्धे परितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रसंगी जालना येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रमोद कुमावत यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) विष्णु पाचफुले,संस्कृत भारतीचे क्षेत्रिय संघटन मंत्री संजीवकुमार,अंबड येथील उद्योजक व युवा सामाजिक कार्यकर्ते इजि.दीपक भोरे, संस्कृत भाषा प्रचार समितीचे अध्यक्ष हरेश शेलगांवकर, उपाध्यक्षा जयश्री कुलकर्णी,श्रीराम वाचनालयाचे सचिव श्रीकांत शेलगांवकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करणात आली. प्रास्ताविक शाम शेलगावकर यांनी केले.
मनोगत व्यक्त करतांना प्रमोद कुमावत म्हणाले कि, संस्कृत भाषेला सध्या चांगले दिवस आहे कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये संस्कृत भाषेला स्थान दिले आहे. संस्कृत भाषेने जगाला वैश्विक विचार दिला. श्रीराम वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे. संस्कृत भाषेमध्ये संस्कार असल्यामुळे संस्कृत भाषा ही सर्वांनी शिकावी. पालक विद्यार्थ्यांकडून संस्कृतचे श्लोक,स्तोत्र पाठांतर करुन घेता त्याबद्दल त्यांनी पालकांचे कोतूक केले. विचाराने समृध्द संस्कृत भाषेने केले आहे. आज वैचारिक दिवाळखोरी झाली आहे. विचाराने समृध्द व्हायच असेल तर वाचन आवश्यक आहे. संस्कृत भाषा विचाराने समृध्द बनवणारी भाषा आहे. संस्कृत भाषेत प्रचंड ज्ञान भंडार आहे.
विष्णु पाचफुले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, श्रीराम संस्कृत विद्यालय व श्रीराम वाचनालय या दोन संस्था मी लहानपणापासून पाहत आहे. विद्यालयात शिकून काही विद्यार्थी मोठे झाले. व्यक्तिला वाचन करणे आवश्यक आहे. संस्कृतचा व वाचन चळवळीचा प्रचार-प्रसार होत असल्यामुळे श्रीराम संस्कृत विद्यालय व श्रीराम वाचनालय या संस्था जालना शहारासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
दीपक भोरे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, विद्यार्थीनी मोबाईलचा वापर कमी करावा व अभ्यासाकडे लक्ष द्यावे. संस्कृत भाषेमध्ये एका शब्दास अनेक समानर्थी शब्द आहे. संस्कृत भाषेमध्ये शब्दाचा क्रम बदलल्यास अर्थ बदलत नाही. संस्कृत भाषा ही स्पष्ट भाषा असून ती शिकण्यास सोपी आहे. जर्मनील १४ विद्यापीठात संस्कृत भाषा शिकवले जाते. विद्यार्थ्यांवर संस्कृत भाषेमुळे संस्कार घडतात. संस्कृत भाषेच्या अध्यनामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे.
यावर्षी संस्कृत स्पर्धेमध्ये ३२८ विद्यार्थांनी सहभाग घेतला त्यापैकी ६६ विद्यार्थांनी प्राविण्य प्राप्त केले. प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ विद्यार्थांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मिनी कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयश्री कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी मनोहर कुलकर्णी,शाहिर बाबुसेवा राठोड, सुधाकर वाहेगांवकर, रामेश्वर खंडागळे, अमित टाकरवनकर,मुकेश मापारी,शैलेंद्र बदनापूरकर,अश्विनी भाले,रेणुका गुलापेल्ली,अभिजित शेंडगे यासह विद्यार्थी,पालक,संस्कृत शिक्षक,वाचक वर्ग उपस्थित होता.
