Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादमहाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, मणीपुर मधील 300 कलावंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे...

महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, मणीपुर मधील 300 कलावंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण वारसा सह्याद्रीचा

 

महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, मणीपुर मधील 300 कलावंत

सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण

वारसा सह्याद्रीचा

 

एम.आय.टी. महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, येथे होणार भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

 

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व सांस्कृतिक कार्य विभाग,

महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार सांस्कृतिक कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार सांस्कृतिक कार्यक्रम एका खास सांस्कृतिक कार्यक्रम “वारसा सह्याद्रीचा” आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग  यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 7  वा. एम.आय.टी. महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे उदघाटन कार्यक्रमात  राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी वारसा सह्याद्रीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, मणीपुर मधील 300 कलावंत लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाचे विविध सादरीकरण रसिकांसाठी सादर होणार आहेत.  हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय, संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments